विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे नोटाबंदीच्या काळातील तब्बल ११८.१८ कोटी अद्यापही बॅंकेत पडून आहेत. यात नाशिक जिल्हा बॅंकेच्या २१ कोटी ३२ लाखांच्या नोटा असून, त्या तब्बल सात वर्षांपासून पडून असल्याने बॅंकेचे आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
त्या नोटा रिझर्व्ह बँकेने तातडीने बदलून द्यायला हव्यात, याबाबत आता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्यातील जिल्हा बॅंकांनी प्रस्ताव सादर केला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री शहा जिल्हा बॅंकांच्या नोटांबाबत नेमका काय निर्णय घेतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (21 Crore demonetised old notes lying in NDCC Bank)