नाशिक : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित व वीजचोरी संबंधित न्यायालयात प्रलंबित महावितरणशी संबंधित नाशिक, मालेगाव आणि नगर मंडळातील एकूण ३६९ ग्राहकांनी प्रतिसाद देऊन तडजोडीच्या माध्यमातून २३ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा केला. शनिवारी (ता. २८) नाशिक व नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये लोकअदालत झाली. या वेळी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. (23 lakh 36 thousand recovery from Lok Adalat participation of Mahavitaran customer )
लोकअदालतमध्ये महावितरणकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले ग्राहकांमध्ये नाशिक मंडळात १०९ ग्राहकांनी तीन लाख ८३ हजार, मालेगाव मंडळातील १४ ग्राहकांनी एक लाख ५० हजार, तसेच नगर मंडळातील २४६ ग्राहकांनी १८ लाख दोन हजार असे नाशिक परिमंडळात एकूण ३६९ दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत २३ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा केला. (latest marathi news)
तसेच वीजचोरी संबंधित एकूण १६ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी एक लाख ६१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. अशी एकूण नाशिक परिमंडळामध्ये एकूण ४६५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. यामध्ये ३५ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा केला आहे. यासाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियमाप्रमाणे संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. संबंधितांनी नाशिक व नगरमधील जिल्हा व तालुका न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी या संधीचा लाभ घेतला.
विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी सदर लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.भविष्यातील आर्थिक व मानसिक कटकटींपासून सुटका होत असल्याने ग्राहकांनी या लोकअदालतीचा लाभ घेतला. महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, जगदीश इंगळे आणि रमेश पवार, वित्त व लेखा विभागाचे सहायक महाव्यवस्थापक हेमंत भामरे, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भडके, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी, कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले यांच्यासह कार्यकारी अभियंते, अभियंते, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.