Nashik News : शहराचा विस्तार वाढत असताना पाणी, रस्ते, पार्किंग समस्यांनी डोके वर काढले आहे. असे असताना त्यात आता हवेत लोंबकळणाऱ्या वीजतारांची भर पडली आहे. मागील पाच वर्षात वीजेचा धक्का लागून २३ जणांचा मृत्यू झाला तरी अद्यापही वीजतारा भूमिगत करण्याचे काम हाती घेतलेले नाही. उघड्या वीजतारा अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, वीजतारा भूमिगत करण्यासाठी ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव वीज कंपनीने शासनाकडे पाठविला आहे. ( 23 people died in 5 years due to hanging power lines in city )