येवला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथील प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. नव्याने मतदार नोंदणी सुरु असून यावेळी येवला-लासलगाव मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत सुमारे २४ हजार मतदार व १६ मतदान केंद्र वाढले आहे. येवल्यातील १२५ व निफाडमधील ४६ अशी १७१ गावांचा मिळून या मतदारसंघाची रचना झालेली आहे. येवला व ४६ गावे अशी विभागणी देखील अनेकदा होऊन प्रादेशिक वादातून शिवसेनेला दोन वेळेस आमदारकी देखील लासलगाव भागाला मिळाली आहे. (24 thousand voters have increased in Yeola Constituency )