नामपूर : विदेशात शिक्षणाची दारे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खुली व्हावीत, यासाठी शासनाच्या पुढाकारातून शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. यंदा तिला कमी प्रतिसाद मिळाला असून, शिष्यवृत्तीच्या राज्यातील ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. परदेशातील शिष्यवृत्तीसाठी खुल्या गटाच्या ४० जागांपैकी केवळ २६ विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली आहे. त्यातही पीएच.डी.साठी केवळ एकाच विद्यार्थ्याचा समावेश झाला. शिष्यवृत्ती योजनेकडे तरुणांनी पाठ का फिरवली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. (25 percent seats in state are vacant of open category of students not available for foreign higher education )