Nashik News : ZP समाजकल्याण विभागात दिव्यांगांच्या 134 घरकुलांसाठी 267 अर्ज! 4 तालुक्यांतून कमी प्रस्ताव

Latest Nashik News : घरकुल योजनेसाठी १३४ उद्दिष्ट असताना २६७ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तर, जोडप्यास अनुदान अंतर्गत सहा जोडप्यांचे उद्दिष्ट असताना केवळ तीनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
gharkul scheme
gharkul schemeesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील ५ टक्के सेस अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगाना घरकुल पुरविणे व दिव्यांग विवाहित जोडप्यास अनुदान देणे या योजना घेतल्या आहेत. यात घरकुल योजनेसाठी १३४ उद्दिष्ट असताना २६७ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तर, जोडप्यास अनुदान अंतर्गत सहा जोडप्यांचे उद्दिष्ट असताना केवळ तीनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. (267 applications for 134 beds for disabled in ZP Social Welfare Department)

जिल्हा परिषदेत सेस निधीचे सर्व विभागाकडून नियोजन सुरू आहे. घरकुलासाठी १.७७ कोटी तर, जोडपे अनुदानासाठी ३ लाख रुपयांची तरतूद आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना पात्र लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी शिफारशीसह या कार्यालयास २४ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते.

साधरणत: प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित होते. परंतु, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेसाठी देवळा, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी पात्र प्रस्ताव प्राप्त झाले. आतापर्यंत २७६ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात अनेक प्रस्ताव अपूर्ण आहेत. (latest marathi news)

gharkul scheme
Nashik News : लासलगावच्या शिवनदीचा श्‍वास गुदमरला! घाणीच्या साम्राज्यमुळे नदी बनली अक्षरश: कचराकुंडी

दिव्यांग विवाहित जोडप्यांना अनुदान योजनेतंर्गत जिल्हाभरातून केवळ ३ प्रस्ताव प्राप्त आहेत. त्यामुळे सर्व पंचायत समित्यांना गटस्तरावरून पात्र प्रस्ताव जि.प. समाज कल्याण विभाग कार्यालयात सादर करण्यासाठी सोमवार (ता.३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

gharkul scheme
Nashik Bytco Hospital : डॉक्टर नसल्यामुळे ‘बिटकोत’ सोनोग्राफी बंद! गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड; खासगी रुग्णालयात धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.