नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राबाहेरील गावांसाठी २८ तलाठ्यांना शुक्रवारी (ता. २७) नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या तलाठ्यांना पुढील दोन महिने वरिष्ठ तलाठ्यांसोबत प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. यानंतर त्यांच्याकडे गावाचा स्वतंत्र कारभार सोपविण्यात येईल. जिल्ह्यातील तलाठ्यांची रिक्त १७३ पदे भरण्यासाठी २०२२-२३ मध्ये शासनाने मंजुरी दिली. शासनस्तरावरून राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत लेखी परीक्षा झाली. (28 Talathi will be appointed in district today )
न्यायालयाचे आदेश व शासन मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने १७३ पदांपैकी पेसा क्षेत्रातील ७६ जागांच्या भरतीला स्थगिती दिली. बिगरआदिवासी (सर्वसाधारण) क्षेत्रातील ९६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील २७ उमेदवार कागदपत्रे तपासणीसाठी हजर झाले नाहीत. त्यांना एक महिन्याची संधी देत रिक्त जागांसह अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ५० जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातही दहा उमेदवार गैरहजर राहिले.
उर्वरित ४० पैकी सर्वसाधारण प्रवर्गातील २८ व्यक्तींना शुक्रवारी नियुक्तिपत्र मिळणार आहे. उर्वरित व्यक्तींनी आरक्षण कोट्यातून असल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी संबंधित विभागाकडून केली जात आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्तिपत्र मिळेल. नियुक्ती झालेल्या उमेदवारांमध्ये येवला, मालेगाव, चांदवड, बागलाण, नाशिक व इगतपुरी या उपविभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. (latest marathi news)
समांतर आरक्षण
पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत ६७ व्यक्ती प्रतीक्षायादीत होते. त्यात समांतर आरक्षणाच्या २१ उमेदवारांचा अहवाल येणे बाकी आहे. याच पद्धतीने आताही समांतर आरक्षण, माजी सैनिक पाल्य, दिव्यांग प्रमाणपत्र आदींची चौकशी होणे बाकी असल्याने त्यांना कालांतराने नियुक्ती देण्यात येणार आहे.
''जिल्ह्यात तलाठी भरती अत्यंत वेगाने करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील तलाठ्यांना नियुक्तिपत्र मिळेल. यातून गावाचा कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे.''-राजेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.