Nashik : तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित सद्गुरू गंगागिरी महाराज १७७ वा फिरत्या नारळी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे तीन लाख भाविकांनी आमटी-भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला. महंत रामगिरी महाराज यांनी रविवार (ता. ११)पासून प्रवचन सेवेस प्रारंभ केला. बेटाच्या परंपरेतील शिवाजी महाराज खोचे व माउली महाराज गुंजाळ यांना कीर्तनाची संधी दिली. पंचाळे येथील तीनशे एकर माळरानावर सप्ताहाचे आयोजन केले आहे. (3 lakh devotees relished Amti Bhakri prasadam during Sadguru Gangagiri Maharaj )