नाशिक : दिवाळी निमित्त मध्यवर्ती कारागृहात बंदी कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीमधून कारागृहाला तीन लाखाहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कारागृहात वर्षभर बनविण्यात आलेल्या वस्तू दीपावलीनिमित्त सामान्य नागरिकांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात येतात. कारागृहातील बंदिस्त कैदी बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी व्हावे, त्यांना रोजगाराची चणचण भासू नये म्हणून त्यांना कारागृहात विविध वस्तू निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (3 lakh income to jail from sale of goods including furniture sky lanterns decorative items )