Nashik News : धोकादायक वाडे आणि घरांची समस्या जैसे थे आहे. महापालिका कुठलेही ठोस नियोजन करत नसल्याने असे वाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडतच आहे. शहरात समाधानकारक पाऊस नसतानाही दोन ते तीन ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक वाडे आणि घरांचा प्रश्न गंभीर होत असतो. दरवर्षी जोरदार पावसाने वाडे आणि घरांचा भाग कोसळण्याच्या घटना घडत असतात. (3 mansions collapsed even though there was no heavy rain)
तीन वर्षांपूर्वी तर एकाच वेळी सहा ते सात वाडे तर संपूर्ण पावसाळ्यात चाळीस वाडे कोसळण्याची घटना घडली होती. तरीदेखील अद्याप वाड्यांचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात महापालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना झालेली नाही. पंचवटी, जुने नाशिक भागात आजही बहुतांशी धोकादायक वाड्यांत अनेक कुटुंब वास्तव्यास असल्याचे आढळून येत आहे. पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही शहरात आवश्यकता पाऊस झालेला नाही. (latest marathi news)
अतिशय थोड्या प्रमाणात पाऊस झाला आहे. असे असताना अशोकस्तंभ येथील विठ्ठल पार्क धोकादायक इमारतीच्या चार गॅलरी पडण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंचवटी येथील धोकादायक वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली. त्यात दोन जण थोडक्यात बचावले. पावसाच्या हलक्या सरीने या दोन घटना घडल्या. तर जोरदार पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केवळ नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला जातो.
तसे न करता कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना करून धोकादायक वाडे घरांची समस्या सोडविण्यात यावी. त्यासाठी महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कारवाई करावी. अन्यथा भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजही जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणावर धोकादायक वाडे असून वाड्यांसह परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार आहे. महापालिकेकडून याचे गांभीर्य ओळखत पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.