Educational News : तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी! राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे निर्देश

Nashik News : राज्यात तिसरी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
3 periodic assessment tests will be conducted
3 periodic assessment tests will be conductedesakal

Nashik News : राज्यात तिसरी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ही चाचणी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. १० ते १२ जुलै या कालावधीत पायाभूत चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे देण्यात आले आहेत. (3 periodic assessment tests will be conducted)

पायाभूत चाचणीत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. स्टार प्रकल्पांतर्गत राज्यात नियतकालिक चाचण्या घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन एक व दोन अशा चाचण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त झाली आहे हे जाणून घेणे हा चाचण्यांचा मुख्य उद्देश आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाचे आयोजन करणे हा उद्देश असणार आहे.

ऑक्टोबर २०२४ चा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी एक, तर एप्रिल २०२५ चा पहिला आठवडा अथवा दुसरा आठवडा या कालावधीत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन घेण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने पायाभूत चाचणीचे नियोजन करण्यात आले आहे. (latest marathi news)

3 periodic assessment tests will be conducted
Nashik News : एकदंतनगर ते गंगेश्‍वर कॉलनी रस्त्याला कोणी वाली आहे का? संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल

या चाचण्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे असणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण देण्यात येऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ही चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये घेण्यात येईल. या चाचणीसाठी विद्यार्थी सध्या ज्या वर्गात शिकत आहेत त्या इयत्तेच्या अगोदरच्या इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यांचा विचार करण्यात आलेला आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणतर्फे प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीमध्ये फोटोकॉपीसाठी अथवा इतर साहित्यही बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शाळा प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे वापरात आणतील याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पायाभूत चाचणीसाठी वेळापत्रक निर्धारित करून देण्यात आले आहे. १० जुलैला तिसरी ते सहावीसाठी ५० गुण, सातवी ते नववीसाठी ६० गुणांची चाचणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी तिसरी ते सहावीला ९० मिनिटे व सातवी ते नववीसाठी १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे.

3 periodic assessment tests will be conducted
Nashik ART HIV Centre : सर्वाधिक HIV उपचार नाशिक एआरटीत! राज्यात अव्वल; 22 गर्भवतींची प्रसुती मात्र बालक अबाधित

असे करा परीक्षांचे नियोजन

-प्रत्येक इयत्तेसाठी दहा गुणांची तोंडी परीक्षाही घेतली जाणार आहे.

-१० जुलैला प्रथम भाषा सर्व माध्यम, ११ जुलैला गणित व १२ जुलैला तृतीय भाषा परीक्षा होईल.

-प्रश्नपत्रिकांचा मोबाईलमधून फोटो काढणे, समाजमाध्यमांमध्ये इतरांना पाठविणे असे प्रकार होता कामा नयेत.

-परीक्षेचे आयोजन करण्याबाबतची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी.

-प्रश्नपत्रिका कमी पडल्यास फोटोकॉपी काढाव्या लागल्यास ही बिले कोणत्याही परिस्थितीत अदा होणार नाहीत.

-चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील असे प्रयत्न करावेत.

-चाचणी कालावधीमध्ये शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण परिषद अधिकारी तसेच शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

-तपासणी केलेल्या १० टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व डायट प्राचार्यांनी करावे.

3 periodic assessment tests will be conducted
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com