Nashik Police Transfer : शहर आयुक्तालयात 3 महिला सहायक आयुक्त येणार! राज्यातील सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

Nashik News : शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील उपविभागीय तथा सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत.
Nashik Police Transfers
Nashik Police Transfersesakal
Updated on

Nashik Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, ६८ उपविभागीय तथा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन सहायक आयुक्त तर, ग्रामीणमधील एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तर, नाशिकमध्ये तीन महिला सहायक आयुक्त रुजू होणार आहेत. (Nashik 3 women assistant commissioners will come to city)

शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील उपविभागीय तथा सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या तर, आज ६८ सहायक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

या बदल्यांमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची अमरावती ग्रामीणमध्ये अंजनगाव उपविभागीय अधिकारी तर, मुख्यालयाचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच, नाशिक ग्रामीण दलातील पेठच्या उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये बदली करण्यात आली आहे. (latest marathi news)

Nashik Police Transfers
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, पैसे घेणारा तलाठी निलंबित

याशिवाय, लातूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी यांची नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीत, मुंबई नागरी हक्क संरक्षणचे उपअधीक्षक सुनील घुगे व अमरावती ग्रामीणचे दर्यापूरचे उपअधीक्षक गुरुनाथ नायडू यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत, तर संजय बांबळे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतून साक्री (धुळे) उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकारी पोलीस आयुक्तालयात आले

मीरा-भाईंदर-वसई-विरार येथील सहायक पोलीस आयुक्त पद्‌मजा बढे, सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनुराधा उदमले आणि नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीतील उपअधीक्षक संगीता निकम यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. 

Nashik Police Transfers
Prithviraj Chavan: माझी लाडकी बहीण योजनेवरुन पृथ्वीराज चव्हाण कडाडले, वाचा काय म्हणाले माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com