Nashik News : रात्री वाढदिवस...आणि आज सर्प दंशाने बालकाचा मृत्यू

Nashik : पहाटे चार वाजेच्या दरम्यान पहाडी कोब्रा या विषारी जातीच्या सापाने सर्पदंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Swaraj Khairnar
Swaraj Khairnaresakal
Updated on

विरगाव वटार (ता. बागलाण ) : येथील सागर ज्ञानदेव खैरनार यांचा मुलगा स्वराज खैरनार ( वय -3) याला पहाटे चार वाजेच्या दरम्यान पहाडी कोब्रा या विषारी जातीच्या सापाने सर्पदंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल दि. 23 जून रोजी स्वराज याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाल्यावर पहाटेच्या सुमारास झोपेत असताना पहाडी कोब्रा या जातीच्या सापने चावा घेतला. त्यानंतर स्वराज याने लगेच आपल्या आई वडिलांना काहीतरी चावल्याचे निदर्शनास आणून दिले. (3 year old Child dies due to snake bite in baglan )

सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आल्यावर लगेच त्याला विरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यात आले. मात्र काल दवाखान्यात ड्युटीवर असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती शिंदे ह्या उपस्थिय नसल्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मलावली. स्वराज हा तीन वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. आयुष्याला नुकतीच सुरुवात करणाऱ्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ह्या कुटुंबावर्ती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वराजच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

Swaraj Khairnar
Nashik News : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा ॲड. गुळवेंना पाठिंबा

-रात्री वाढदिवस व सकाळी अंत्यविधी-

वेळ कशी येईल ते सांगता येत नाही रात्री सर्व कुटुंब आनंदाने स्वराजचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करत होते सर्व कुटुंब आनंदात होतं. आणि नियतीच्या खेळाने सकाळी त्याच बालकाची अंत्यविधी करण्याची वेळ ह्या कुटुंबावर आली. पहाटे चार वाजेच्या सुमारास पहाडी कोब्रा या दुर्मिळ अतिविषारी जातीच्या सापाने चावा घेतल्याने काही तासांच्या अंतरात त्याच स्वराजचा अंत्यविधी करायची वेळ खैरनार कुटुंबावर आली.

त्यानंतर लगेच सर्प मित्र देवा पवार यांना तात्काळ पाचरण करण्यात आले. सर्प मित्र देवा पवार याने आपल्या युक्तीने पलंगाखाली लपलेल्या पहाडी कोब्रा जातीच्या सापाला लगेच पकडून नैसर्गिक अज्ञातवासात सोडून दिले.

Swaraj Khairnar
Nashik News : बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 857 कोटीचा लाभांश सादर; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडे धनादेश सुपूर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.