Nashik Encroachments : तिसऱ्या दिवशी 30 अतिक्रमणे उद्‌ध्वस्त! अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडमध्ये

Nashik News : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कॉलेज रोड व गंगापूर रोड सुरू केलेली कारवाई सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३) सुरू राहिली.
Municipal employees removing encroachment at Gangapur Road.
Municipal employees removing encroachment at Gangapur Road.esakal
Updated on

Nashik News : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कॉलेज रोड व गंगापूर रोड सुरू केलेली कारवाई सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ३) सुरू राहिली. दिवसभराच्या कारवाईमध्ये तीस अतिक्रमणे हटविण्यात आले. शहरातील अतिक्रमणावरून विधानसभेत मांडण्यात आलेली लक्षवेधी व नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेचा अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. (30 encroachment destroyed on third day)

गेल्या तीन दिवसापासून कॉलेज रोड व गंगापूर रोड भागात पक्का बांधकामांचे अतिक्रमण तोडले जात आहे. रूफ टॉपवरील, हॉटेल, सामासिक अंतरातील बांधकाम तोडण्यात आले. कॉलेज रोड व गंगापूर रोड व्यतिरिक्त कारवाईची व्यक्ती वाढविताना एकलहरे- सामनगाव रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या भागामध्ये रस्त्यावर छोटी-मोठी अतिक्रमणे थाटण्यात आली होती.

या भागात अतिक्रमण कारवाई

हमारा हॉटेल, जुना गंगापूर नाका येथील हॉटेल बॉर्न विवांता, याहू हॉटेल, हॉटेल वीली डिलिशिअस, ओरिजिन, ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी, बिग सिटी या हॉटेलचे अनधिकृत रूप टॉप हटविण्यात आले. (latest marathi news)

Municipal employees removing encroachment at Gangapur Road.
Nashik Encroachment : विधीमंडळातील लक्षवेधीनंतर अतिक्रमण कारवाई! शहरातील 2 हजार 791 अतिक्रमण धारकांना नोटिसा

सामासिक अंतरातील आनंदवली येथील हॉटेल वाडा, दिवट्या बुधल्या, राका कॉलनी येथील सप्तशृंगी हॉटेल, पंडित कॉलनी येथील काबरा साडी येथील कमान, उडपी डोसा कॉर्नर, पंडित कॉलनी येथील गणेश मंदिर परिसरातील दोन दुकाने.

मॅरेथॉन चौकातील हॉटेल सदगुरू, गंगापूर रोडवरील देसाई सलून, कात्रज डेअरी एंटरप्राइजेस शेड, रामप्रसाद फळ मार्केट, हॉटेल पंचमचे सामासिक अंतरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

Municipal employees removing encroachment at Gangapur Road.
Nashik Encroachment : कॉलेज, गंगापूर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी मोहीम! 50 पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.