नाशिक : राज्यात परतीच्या पावसाने उसंत दिल्यानंतर द्राक्षांच्या गोड बहाराच्या ऑक्टोबर छाटणीला वेग आला आहे. पण बाजारपेठेतील भावाचे गणित जुळविण्यासाठी ६० दिवस छाटणी होणे अपेक्षित असताना यंदा ३० दिवसांत ९० टक्के छाटणी झाली. आठवडाभरात छाटणी पूर्ण होणे अपेक्षित असून हवामानाने साथ दिल्यास यंदा राज्यात द्राक्षांचे ३० लाख टनापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.
मागील हंगामात कंटेरनच्या वाढलेल्या भाड्याची समस्या गंभीर बनली होती. यावेळी कंटेनरचे भाडे कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. पण युक्रेनमधील युद्धामुळे युरोपमध्ये १२ ते १३ टक्क्यांनी महागाई वाढली आहे. त्यामुळे त्याची झळा किती बसणार हे द्राक्षे प्रत्यक्षात युरोपमध्ये पोचल्यावर समजेल. युरोपमध्ये सर्वसाधारणपणे सात ते आठ हजार कंटेनरभर एक लाख टनाच्या आसपास द्राक्षांची निर्यात होते. याशिवाय इतरत्र तेवढीच द्राक्षे निर्यात केली जातात.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये द्राक्षांची आवक बऱ्यापैकी होण्याच्या दृष्टीने छाटणी महत्त्वाची बाब असते. यंदा छाटणी लांबल्याने मार्चमध्ये एकाचवेळी द्राक्षे बाजारात येण्याची परिस्थिती सध्या पाहावयास मिळते. मागील हंगामात जानेवारीमध्ये द्राक्षांची स्थिती चांगली होती. मात्र पाऊस झाल्याने मणी तडकल्याने द्राक्षांचे नुकसान झाले होते.
साठ कोटींपर्यंतचा भुर्दंड
परतीचा पाऊस सुरु राहिल्याने हा पाऊस थांबेपर्यंत पानगळीसाठीचा शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. शिवाय फुलोऱ्याच्या पुढे गेलेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या जवळपास ३० हजार एकरावरील द्राक्ष बागांवर डाऊनी आणि करप्याच्या नियंत्रणासाठी एकरी २० हजार रुपयांपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. हा ६० कोटींपर्यंतचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. शिवाय पावसाने घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या फुलोरा, अनावश्यक फुटी काढणे, छाटणीनंतरची फुटलेली पोंगा, छाटणीनंतर प्रक्रिया अशा अवस्थेत द्राक्ष बागा आहेत.
टिकाऊ वाण लागवडीचे प्रमाण (टक्क्यांत)
८० पेरु
७० दक्षिण आफ्रिका
५० चिली
गेल्या चार वर्षांपासून अचानक हवामानात होणाऱ्या बदलाचा फटका द्राक्षबागांना बसत आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी द्राक्षांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याकडे लक्ष देताहेत. द्राक्षांना नेमका किती भाव मिळणार हा यंदाच्या हंगामातील खरा प्रश्न असेल.
- कैलास भोसले, महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघ
जागतिक बाजारपेठेचा विचार करून येत्या पाच वर्षांमध्ये द्राक्षांचे वाण बदलाचा वेग वाढवावा लागेल. सह्याद्री फार्मर्सतर्फे ‘रेड'' वाणाची चाचणी सुरु आहे. पुढच्या वर्षांपासून आमच्या सभासदांना वाण देण्यास सुरवात होईल. बेदाण्याच्या वाणाचे प्रमाण वाढवावे लागेल.
- विलासयाय शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.