Nashik News : वन विभागांतर्गत पश्चिम विभागात १.८८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत फक्त तीन हजार खड्डे आतापर्यंत तयार आहे. ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. तरीही अल्प खड्डे तयार केले गेले आहे. तर उर्वरित वृक्षारोपण कधी होणार, याबद्दल साशंकता निर्माण झाली. तसेच वन विभागाकडे शिल्लक रोपांची संख्या ही लाखांनी आहे. (3000 pits for tree plantation by forest department)
लवकर रोपण न केल्यास रोपे मृत होण्याची शक्यता असून, नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान वनविभागाच्या विविध खात्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते. दाट वनक्षेत्र असलेला परिसर हा वन विभागाच्या पश्चिमेच्या अंतर्गत आहे. वृक्षारोपणाची पूर्वतयारी ही एप्रिल मे महिन्यापासूनच सुरू होते.
त्या दरम्यान खड्डे तयार करण्यासाठी सुरवात केली जाते. मात्र जून व जुलै तब्बल साठ दिवसांचा कालावधी उलटूनही पश्चिम विभागात तीन हजार खड्डे आतापर्यंत तयार आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चांगलीच धावपळ पश्चिम विभागाला करावा लागणार आहे. (latest marathi news)
नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी व जैवविविधता टिकून राखण्यासाठी वनक्षेत्राची अत्यंत आवश्यकता आहे. राज्यातील वनक्षेत्र हे २० टक्क्याहून ३३ पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे.
वेगवेगळे योजनांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व शाळा महाविद्यालय याबरोबर लोक सहभागातून विविध वनविभागाच्या शाखांमार्फत वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. उर्वरित वृक्षारोपणाचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी वन विभाग पश्चिमेला युद्ध पातळीवर वृक्षारोपण अभियान हाती घ्यावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.