Nashik Dengue News : जिल्ह्यात जुलैमध्ये डेंगीचे थैमान! 31 रुग्णांना लागण, ग्रामीणमध्येही प्रादुर्भाव

Nashik Dengue : शहर परिसरात डेंगी रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे.
nashik Dengue Cases
nashik Dengue Casesesakal
Updated on

Nashik Dengue News : शहर परिसरात डेंगी रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. जून महिन्यात डेंगी रुग्णांची संख्या २८ होती. ती जुलै महिन्यात ३१ वर पोचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण दिंडोरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या पाचशेवर गेली आहे. (31 patients infected of Dengue in rural areas and district )

दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने गत आठवड्यात आढावा बैठक घेत ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्ह्यात सुरवातीस दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने पुन्हा ओढ दिली. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तब्बल १५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

दुसरीकडे हवेमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्याने घराघरांत कूलर, एसी यांचा वापर वाढला आहे. त्याठिकाणी पाणी साचल्याने डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊन लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, ग्रामीण भागातही डेंगी रुग्णांची संख्या वाढली. मे महिन्यात एकूण आठ रुग्ण आढळले होते. तर जूनमध्ये ही संख्या २८ वर पोचली होती. (latest marathi news)

nashik Dengue Cases
Nashik Dengue News: शहरात डेंगीने एकाचा मृत्यू

जुलै महिन्यात हीच संख्या ३१ वर पोचली असल्याने डेंगीचा प्रसार जोरात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जानेवारीपासून ते आतापर्यंत १५ तालुक्यांतून एकूण ११० रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग सर्तक झाला असून, विविध उपाययोजनांचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले आहेत.

जुलै महिन्यातील रुग्ण

निफाड (दोन), बागलाण (पाच), नाशिक (सहा), सिन्नर (तीन), दिंडोरी (आठ), इगतपुरी (दोन), त्र्यंबकेश्वर (तीन), नांदगाव (दोन), पेठ, येवला, कळवण, मालेगाव (ग्रा.), सुरगाणा याठिकाणी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

nashik Dengue Cases
Nashik Dengue News : 21 वर्षीय विवाहितेचा डेंगूने मृत्यू; 15 रुग्ण असल्याची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com