नाशिक : राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी ‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टल राज्य सरकारने सुरू केले. मात्र, या पोर्टलवरील तक्रारींचे निवारण करण्यात नाशिक जिल्हा परिषद पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल ३१२ तक्रारी प्रलंबित आहेत.
तक्रारी प्रलंबित असल्याने ग्रामविकास विभागाचे सचिवांनी जिल्हा परिषद प्रशासनावर खुली नाराजी व्यक्त केली आहे. तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित विभागांना ९ सप्टेंबरचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. (Nashik 312 complaints pending on aple sarkar portal)