नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून दहा दिवसात ३१६७ होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे जप्त केले. १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी राजकीय फलक, बॅनर्स, झेंडे उतरविणे आवश्यक आहे. परंतु अतिक्रमण विभागाकडून मोहीम राबविली जात आहे. सहाही विभागातील मोहीम राबविली. सिडको विभागातून १२ जाहिरात फलक, १२२ पोल बॅनर्स, ७ स्टॅन्ड बोर्ड, ५७ होर्डिंग्ज, २०२ झेंडे, ७२ कमानीवरील बॅनर्स हटविले. (3167 hoardings banners and flags were removed in city in 6 divisions campaign by Municipal Corporation)