Nashik News : गोदा स्वच्छता अभियानात 350 सेवेकऱ्यांचा सहभाग! स्वामी समर्थ सेवा केंद्रात आरोग्य तपासणी, मोफत औषधवाटप

Nashik News : गेल्या दोन वर्षांपासून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तीर्थक्षेत्री स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे
Servants of Swami Samarth Sevamarga while carrying out cleanliness drive on dockyard.
Servants of Swami Samarth Sevamarga while carrying out cleanliness drive on dockyard.esakal
Updated on

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या गोदा स्वच्छता अभियानात ३५० सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन गोदाकाठ स्वच्छ केला. याच निमित्ताने गोदाकाठी असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजित आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटपाचा ३०६ रुग्णांनी फायदा घेतला.

गेल्या दोन वर्षांपासून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तीर्थक्षेत्री स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यात गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे हे नियमितपणे उपस्थित राहून महिला- पुरुष सेवेकऱ्यांना यानिमित्त मार्गदर्शन करून, स्वच्छता अभियानात स्वतः सहभागी होत असतात. (Nashik 350 helpers participated in Goda Swachhta Mission marathi news)

रविवारी (ता. १७) झालेल्या मोहिमेत चंद्रकांतदादा मोरे स्वच्छता कार्यासाठी आणि आरोग्य शिबिरासाठी बालाजी कोट केंद्रात एकत्रित झालेल्या शेकडो सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की भारतात, महाराष्ट्र आणि त्यातही नाशिक सारख्या पुण्यभूमीत आपण जन्म घेतला ही खूपच भाग्याची बाब आहे.

गंगामाईची सेवा करण्याची संधी आपणास मिळाली ही महत भाग्याची गोष्ट आहे. गेली दोन वर्ष आपण ही पर्वणी साधतो आहे. भविष्यात सुद्धा हे स्वच्छता अभियान अखंडपणे आपण राबविणार आहोत आणि त्यासाठी आपण असाच उत्साहाने सहभाग नोंदवावा. जिल्हा प्रतिनिधी केशव घोडेराव सेवामार्गाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

आरोग्यदूत विभागातर्फे योगशिक्षक राजेंद्र लोखंडे यांनी निरामय व आनंदी जीवनासाठी योग, ओंकार साधना, प्राणायाम यांचे महत्त्व सांगून ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित एक दिवस योग शिबिराचे प्रशिक्षण घेऊन तसेच सहभागी होऊन स्वतःच्या शारीरिक व मानसिक विकासासोबत इतरांचाही फायदा करून देण्यासाठी प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले. . (latest marathi news)

Servants of Swami Samarth Sevamarga while carrying out cleanliness drive on dockyard.
Nashik News : अंबड गाळे प्रकल्प लिलावास लागेना मुहूर्त; अनेक लघु उद्योजकांचा हिरमोड

आरोग्यदूत जिल्हा प्रतिनिधी सुनीता काकड यांनी आरोग्यदूत संकल्पना, आजीबाईचा बटवा याविषयी माहिती दिली. डॉ. जैन यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप केले. सेवेकऱ्यांनी गंगा गोदातीरी असलेल्या रामतीर्थ, गोदावरी मंदिर व परिसराची स्वच्छता करून देवीदेवतांचा सन्मानही केला.

अभियानाचे नियोजन प्रशासकीय विभागाचे काळे, सुवर्णा काठे, श्रीमती सरोदे, आरोग्यदूत तालुका प्रतिनिधी पुरकर, प्रतिभा पुरकर, पुष्पा जमधडे, मनीषा लोखंडे व आरोग्यदूत प्रतिनिधी यांनी केले. श्रमदान विभाग तसेच इतर १८ विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदातीरी व परिसरात असलेला प्लॅस्टिक कचरा, झाडून स्वच्छ करण्यात आला. नदीपात्रातील फुले इतर कचरा मिळून २५ गोणी कचरा गोळा करण्यात आला.

Servants of Swami Samarth Sevamarga while carrying out cleanliness drive on dockyard.
Nashik News : नाशिकच्या 4 कंपन्या आफ्रिकेत उभारणार उद्योग! ‘आयडियास 2022’च्या आधारे सामंजस्य करार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.