Nashik News : नाशिकमधील महिला गुंतवणूकदारांच्या ‘एयूएम’मध्ये 5 वर्षांत 3.9 एक्स पटीने वाढ

Nashik News : भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक, ॲक्सिस म्युच्युअल फंडाने सध्याच्या एक कोटी ॲक्सिस म्युच्युअल फंड ग्राहकांच्या डेटाचे विश्लेषण करत देशव्यापी सर्वेक्षण केले आहे.
3.9x increase in AUM of women investors in Nashik
3.9x increase in AUM of women investors in Nashikesakal
Updated on

Nashik News : भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक, ॲक्सिस म्युच्युअल फंडाने सध्याच्या एक कोटी ॲक्सिस म्युच्युअल फंड ग्राहकांच्या डेटाचे विश्लेषण करत देशव्यापी सर्वेक्षण केले आहे आणि या सर्वेक्षणानंतर ‘महिला गुंतवणूक वर्तणूक अहवाल २०२४’ हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. (3.9x increase in AUM of women investors in Nashik)

गेल्या पाच वर्षांत (३१ मार्च २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३) नाशिकमध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या ३.१ पटीने वाढली आहे. याच काळात नाशिकमध्ये महिला गुंतवणूकदारांच्या एयूएममध्ये ३.९ पट वाढ झाली आहे, तर याच कालावधीत महाराष्ट्रात महिला गुंतवणूकदारांच्या एयूएममध्ये ३.५ पट वाढ नोंदविली गेली आहे.

जवळपास ७२ टक्के महिला गुंतवणूकदार आता गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्ररीत्या घेतात, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रगती करण्यासाठी महिला गुंतवणूकदारांनी बदललेल्या दृष्टिकोनावरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. हा दृष्टिकोन बदलल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी त्यांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

या सर्वेक्षणाचे महत्त्व सांगताना ॲक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी. गोपकुमार ठामपणे म्हणाले, की म्युच्युअल फंड उद्योगात वेगाने बदल होत आहेत. कारण जास्तीत जास्त लोक, विशेषत: महिला या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. (latest marathi news)

3.9x increase in AUM of women investors in Nashik
Nashik News : ह्रदयद्रावक घटना! जन्मत:च मयत अर्भकाला पुरायला जागा सापडेना, गोदाघाटावर दिले टाकून; परिचारिकेमुळे झाला उलगडा

गुंतवणूकदारांची गुंतवणुकीची पद्धत पाहिली, ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या ३० टक्के ग्राहक या महिला आहेत आणि एकूण एयूएमच्या ३५ टक्के महिला आहेत. गुंतवणूकदारांसाठी विकसित होत असलेला लँडस्केप समजून घेणे, विशेषत: गुंतवणूकदार महिला असतील, तर त्यांना प्राधान्य देणे, हे सतत प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

आमच्या अहवालाचा उद्देश या पैलूवर प्रकाश टाकणे आहे. गुंतवणूकदारांच्या विशिष्ट गरजा आणि गुंतवणुकीच्या पद्धतीचे विश्लेषण करून त्यांची आर्थिक वाटचाल नीट व्हावी, यासाठी त्यांना सक्षम करणे आणि गरज लागल्यास त्यासाठी ऑफरमध्ये सुधारणा करण्याचे ॲक्सिस एएमसीचे उद्दिष्ट आहे.

3.9x increase in AUM of women investors in Nashik
Nashik ART HIV Centre : सर्वाधिक HIV उपचार नाशिक एआरटीत! राज्यात अव्वल; 22 गर्भवतींची प्रसुती मात्र बालक अबाधित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.