Nashik Crime News : जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी २०२१ मध्ये गजाआड करण्यात आली होती. या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवीत जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र अन्य तिघांना निर्दोष मुक्त केले आहे. ()
न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांनी शुक्रवारी (ता. २२) खटल्याचा अंतिम निकाल देताना आरोपींनी अर्थव्यवस्थेला बाधा पोचविल्याचे नमूद करत शिक्षा ठोठावली. सुरगाणा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने उंबरठाण गावाच्या बाजारात ६ सप्टेंबर २०२१ ला दुपारी साडेअकराच्या सुमारास छापा टाकला होता. यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला गजाआड केले होते.
हरीश वाल्मीक गुजर (२९), बाबासाहेब भास्कर सैद (३८), अक्षय उदयसिंग राजपूत (२९), प्रकाश रमेश पिंपळे (३१, चौघे रा. येवला), राहुल चिंतामण बडोदे (२७), आनंदा दौलत कुंभार्डे (३५, दोघे रा. चांदवड) आणि किरण बाळकृष्ण गिरमे (४५, रा. निफाड) या सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापैकी अक्षय राजपूत, प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांना निर्दोष मुक्त केले आहे. इतर चौघांना न्यायालयाने दोषी ठरवताना शिक्षा ठोठावली आहे.
पोलिस निरीक्षक एस. आर. कोळी यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता रवींद्र निकम यांनी आठ साक्षीदार तपासले. हा गुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण करणारा गंभीर स्वरूपाचा अपराध आहे, असा ठपका न्यायाधीशांनी निकाल जाहीर करताना ठेवला.
विंचूरला बनवल्या बनावट नोटा
या प्रकरणात किरण गिरमे याने विंचूर (ता. निफाड) येथील प्रिटिंग प्रेसमध्ये आनंदा कुंभार्डेच्या मदतीने शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बनविल्या होत्या. साथीदारांच्या सहकार्याने बनावट नोटा चलनात आणल्या. पोलिसांनी कारवाई करताना आरोपींकडून शंभरच्या १९४ आणि पाचशेची एक, अशा १९ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.