अंबासन : येथील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील निमदरा फाट्यानजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून पहाटेच्या सुमारास तब्बल ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित शेतकऱ्याने जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.(40 to 45 quintals of onions were stolen from Ambasan)
मालेगाव-नामपूर रस्त्यावरील शेतकरी एम. एस. पाटील यांच्या शेतातील (गट क्रमांक ५२५/१) मध्ये युवा शेतकरी देविदास शामराव कोर याने पाच एकर क्षेत्र तोडबटाईने केली आहे. देविदासने शेतात कांदा लागवड केली होती. कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांना एक लाख ३५ हजार रुपयांहून अधिक खर्च आल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वीच दोन ट्रॉली कांदा त्यांनी विक्री केला होता. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतात राखून ठेवलेला दोन ते अडिच ट्रॉली कांदा मंगळवारी (ता.१४) कुटुंबियांसह कांदा प्रतवारी करून विक्रीसाठी ट्रॉलीत भरत होते. सायंकाळी उशीर झाल्याने त्यांनी सकाळी कांदा भरण्याचे ठरविले.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्याने शेतात ट्रॉलीतील कांदा झाकण्यासाठी गेले असता त्यांना ट्रॉलीतील कांदा व शेतातील कांदा चोरी गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे युवा कांदा उत्पादक शेतकरी देविदास कोर यांनी तत्काळ ही माहिती कुटुंबियांना सांगितली. शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चोरीला गेल्याने कुटुंबियांना गहिवरून आले होते. (latest marathi news)
दरम्यान, देविदास याने तातडीने वडनेर खाकुर्डी येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, रात्री अनेक वाहने जाताना दिसून आली. यामुळे थांगपत्ता लागू शकला नाही. जायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन कांदा चोरीची तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
"शेतात शिरोळी करून ठेवलेला कांदा होता. दुसऱ्या दिवशी विक्रीसाठी ट्रॅक्टरमध्ये भरत होतो. मात्र, अंधार झाल्याने दुसऱ्या दिवशी उर्वरित कांदा ट्रॉलीत भरणार होतो. पहाटे पावसाचे वातावरण दिसून आल्याने शेतात गेलो असता चोरीचा प्रकार समोर आला. मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे." - देविदास कोर, शेतकरी, अंबासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.