Nashik Agriculture News: सोयाबीनच्या दरात 400 रूपयांची वाढ; पालखेड मिरचीचे उपबाजारात दर पोहचले साडेचार हजारांवर

Nashik Agriculture : गेल्या सहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर चार हजार रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास होते.
soyabean
soyabeanesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर चार हजार रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास होते. आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजी आली असून, पालखेड मिरचीचे (ता. निफाड) उपबाजारात दर चार हजार ६०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत झेपावला आहे. मात्र, मिळणारा हा दर अजूनही हमीभावापेक्षा तीन रूपयांनी खाली आहे. विधानसभेच्या निवडणुका व जागतिक पातळीवर तेलाचे दरवाढीचे संकेत असल्याने ही तेजी आली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोयाबीनच्या पिकांवर निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे काही प्रमाणात अर्थकारण अवलंबून आहे. (400 rupees increase in price of soybeans )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.