Nashik News : राजीव गांधी अपघात सानुग्रह योजना शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद (नाशिक) यांच्या कार्यालयाकडून अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी राबवली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध अपघातामध्ये मयत झालेले २६ विद्यार्थी आणि शस्त्रक्रिया करून उपचार घेण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने ४२ लाख ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. (42 lakhs to district under student accident scheme )
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता राज्यातील पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी अपघात योजना एक ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार नियमित स्वरूपात राबविण्यात येत आहे. (latest marathi news)
सुधारित शासननिर्णयानुसार लाभार्थी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. अपघातात मयत २६ विद्यार्थी आणि शस्त्रक्रिया करून उपचार घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकतेच मंजूर करण्यात आल्याने वारसांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
अशी आहे योजना
सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास दीड लाख तर अपघातामुळे कायमचे अपंगत्व एक लाख रुपये अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास उपचारासाठी अधिकतम एक लाख रुपये, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख सानुग्रह अनुदान दिले जाते. विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास उपचारासाठी रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये दिले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.