Nashik News : शहरात 47 आरोग्यवर्धिनी केंद्रांना अखेर मुहूर्त; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पंचवटीत आज उद्घाटन

Nashik : केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अखेरीस आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यासाठी मुहूर्त सापडला आहे.
heath care
heath care esakal
Updated on

Nashik News : केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अखेरीस आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. १०६ पैकी शहरात ४७ केंद्रांचे मंगळवारी (ता. १२) उद्घाटन होत आहे. त्यानंतर आचारसंहितेपूर्वी २५ स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने उभारण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शहरात महापालिकेची चार मोठी रुग्णालये, दोन प्रसूतिगृह व ३० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. (nashik 47 Arogyavardhini centres in city marathi news)

वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना चांगल्या दर्जाची व सत्वर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. चुंचाळे शिवारात प्रायोगिक तत्त्वावर एक आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले. उर्वरित १०५ आरोग्य केंद्रे उभारण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

यातच केंद्र सरकारकडून प्राप्त होणारा निधी व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली. यासह लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने आचारसंहितेच्या कचाट्यात आरोग्यवर्धिनी दवाखान्याचे प्रस्ताव अडकण्याची भीती निर्माण झाल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिका प्रशासनाला फैलावर घेत नवीन वर्षाच्या सुरवातीला किमान ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता.

यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. महापालिकेची समाजमंदिरे तसेच मालकीच्या अन्य मिळकतीमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहेत. मंगळवारी (ता.१२) पंचवटी विभागातील वडजेनगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयुष्मान आरोग्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहे. (latest marathi news)

heath care
Nashik News : इगतपुरी तालुक्यात नारळाची लागवड! राज्य शासनाच्या कोकण संशोधन केंद्राचा पुढाकार

बीएएमएस चालविणार दवाखाने

आरोग्यवर्धिनी दवाखान्यात एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी ६० हजार रुपये मानधन निश्‍चित करण्यात आले. मात्र एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अखेरीस बीएएमएस शैक्षणिक अहर्ता प्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना चाळीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

अशी आहेत आरोग्यवर्धिनी केंद्रे

महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यवर्धिनी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सिडको विभागात ९, पंचवटी विभागात १०, नाशिक रोड विभागात ८, सातपूर विभागात ७, पश्चिम विभागात ७, पूर्व विभागात ६ या प्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जात आहे.

२५ ठिकाणी आपला दवाखाना

केंद्राच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जात आहे तर राज्य सरकारच्या वतीने मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरात २५ ठिकाणी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. आठ दिवसात आपला दवाखाना संदर्भातील नावांची यादी निश्‍चित होईल. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

या रुग्णांवर उपचार

ग्रामीण भागात २५ हजार लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र आहे. त्याचं धर्तीवर शहरी भागात तत्काळ उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. असंसर्गजन्य आजाराच्या जसे मधुमेह, रक्तदाब सारख्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कष्टकरी लोकांवर कामावरून आल्यानंतरही उपचार होण्यासाठी दोन ते दहा अशी वेळ आरोग्यवर्धिनी केंद्रांची निश्‍चित करण्यात आली आहे.

heath care
Nashik News: गिरणा-मोसमचा बेकायदेशीर वाळूउपसा थांबता थांबेना! महसूल-पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.