नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून दहा ते वीस हजार क्यूसेस वेगाने पाणी सोडल्यास सखल भागात पाणी पोचते, अशी कायमस्वरूपी ४८ स्थळे असुरक्षित घोषित करण्यात आली आहेत. अशा असुरक्षित स्थळांवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पात उपाययोजना नसल्याने नदी काठाच्या बाजूला सुशोभीकरण करून करोडो रुपयांचा खर्च करण्यास विरोध होत आहे. त्याऐवजी पूरस्थितीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीने नमामि गोदा प्रकल्प अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. (Nashik Namami goda project marathi news)
‘नमामि गंगे’ च्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून प्रकल्पासाठी जवळपास १८०० कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहे. जलशक्ती मंत्रालयाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या.
प्रकल्पात नवीन मलनिस्सारण केंद्र उभारण्याबरोबरच अस्तित्वातील जुन्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण करणे, मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती व क्षमतावाढ, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र निर्मिती, नवनगरातील सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविणे, सांडपाण्यासाठी सिव्हर लाइनचे जाळे टाकणे, नदी किनारा अत्याधुनिक करणे, गोदाघाटांचे नूतनीकरण करणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
परंतु एकीकडे नमामि गोदा प्रकल्पांतर्गत करोडो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे गोदाकाठचे ४८ असुरक्षित स्थळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नमामी गोदा प्रकल्पात ४८ असुरक्षित स्थळांवर पूरस्थितीत संभाव्य उपाययोजनांचाही समावेश करण्याची मागणी होत आहे. (Latest Marathi News)
ही आहेत असुरक्षित स्थळे
गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर्व विभागातील भांडी बाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज धर्मशाळा परिसर, टाळकुटेश्वर पूल, काझी गढी, म्हसोबा वाडी. पश्चिम विभागातील गंगावाडी, जोशीवाडा, घारपुरे घाट, मल्हारखान, सुंदरनारायण मंदिर, रविवार कारंजा, तेली गल्ली, दत्तवाडी, स्वामिनारायण कोट, चित्तपावन संस्था कार्यालय, गायधनी लेन, बालाजी कोट, कापड बाजार, बोहरापट्टी, दिल्ली दरवाजा, कानडे लेन, पगडबंद लेन, ओकाची तालीम लेन, नाव दरवाजा, सोमवार पेठ, तिवंधा, गुलालवाडी, मोदकेश्वर मंदिर. पंचवटी विभागातील गोदावरीनगर, गणेशवाडी, श्रध्दा लॉन्स, चतुसंप्रदाय आखाडा, पुरिया रोड, नारोशंकर मंदिर, सरदार चौक, चिंचबन, कबुतर खाना, मखमलाबाद नाका तसेच सातपूर विभागातील आनंदवली, संत आसाराम बापू आश्रम तसेच नासर्डी नदीच्या दोन्ही बाजूच्या महादेव वाडी, जगताप वाडी, कांबळेवाडी, गौतमनगर, आयटीआय पूल, यमुनानगर, मुंबई नाका ही स्थळे पूरस्थितीत असुरक्षित घोषित करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.