Nashik Jal Jeevan Mission Scheme : जलजीवन मिशन योजनेच्या खर्चात गेल्या वर्षी जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता. मात्र, यंदा निधी खर्च धिम्यागतीने सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एक हजार २२२ योजनांपैकी आतापर्यंत ७६३ योजनांची कामे पूर्ण झाली. त्यावर, मंजूर झालेल्या एक हजार ४१० कोटींपैकी ७०८ कोटी (५०.२२ टक्के) खर्च झाला. यात नांदगाव तालुका पाणीपुरवठा योजना खर्च करण्यात आघाडीवर आहे. (50 percent of district fund expenditure of Jal Jeevan Mission )