500 crore works were omitted from Simhastha
500 crore works were omitted from Simhasthaesakal

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ आराखड्यातून 500 कोटींची कामे वगळली

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने भूसंपादन वगळता तयार केलेल्या ११ हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला कात्री लावण्यात आली आहे.
Published on

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने भूसंपादन वगळता तयार केलेल्या ११ हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला कात्री लावण्यात आली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांची अनावश्यक कामे वगळण्यात आली आहे. शासनाला अंतिम आराखडा सादर करताना त्यात आणखी वजावट किंवा किंमत वाढू शकते अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली. (500 crore works were omitted from Simhastha)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात जवळपास आठ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. आराखडा अंतिम होत असताना ११,६०० कोटी रुपयांवर आराखड्याची किंमत पोचली.

त्या व्यतिरिक्त शहरात स्वतंत्ररीत्या ५६ किलोमीटर लांबीचे दोन बाह्य रिंगरोड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी भूसंपादनासह पाच हजार कोटी रुपयांचा खर्च दर्शविण्यात आला. मात्र नाशिक महापालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत रिंगरोड तयार करण्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे आराखड्याची एकूण किंमत जवळपास १७ हजार कोटींपर्यंत पोचली.

आराखड्याची किंमत अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने वास्तवदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या. त्याचबरोबर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सिंहस्थ आराखडासंदर्भात आयुक्तांकडे विचारणा केली. त्यानंतर यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा सादर करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख दिली. (latest marathi news)

500 crore works were omitted from Simhastha
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणाचे आव्हान; 2 कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज

त्यानंतर महापालिका आयुक्त करंजकर यांनी शहरभर दौरे करून आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांची छाननी केली. यामध्ये जवळपास १०० किलोमीटरचे रस्ते, एसटीपी प्लांट व अन्य बांधकाम विषयक कामांना कात्री लावण्यात आली. जवळपास ५०० कोटी रुपयांच्या कामांना कात्री लावण्यात आली आहे.

"महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात प्रास्तावित करण्यात आलेल्या कामांची व्यवहारता तपासून अहवाल अंतिम केला जाणार आहे. ३१ जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला अहवाल सादर केला जाईल." - अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

महापालिकेचा विभागनिहाय आराखडा (कोटीत)

बांधकाम विभाग- ३,७५०

पाणी पुरवठा- १,०००

सांडपाणी व्यवस्थापन- २,४९१

वैद्यकीय विभाग- ५५५

घनकचरा व्यवस्थापन- १५१

विद्युत- १६७

उद्यान- ४१

अपातकालीन- ३२

आयटी जनसंपर्क- १९

500 crore works were omitted from Simhastha
Nashik Simhastha Kumbh Mela: रिंगरोडच्या ‘मिसिंग लिंक’ जोडणार; सलग दुसऱ्या दिवशी सिंहस्थातील प्रस्तावित कामांची पाहणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.