Nashik News : इंदिरानगर परिसरातील महिंद्रा बँकेच्या भरण्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापकांनी तक्रार केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बनावट नोटांची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे.
इंदिरानगर परिसरात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील सुनील नगरकर (रा. अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ३ जून रोजी त्यांच्या शाखेमध्ये सुबोध सुधीर रत्नपारखे ( रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले. त्याचवेळी त्यांच्याकडे असलेल्या पैशांमध्ये ५०० रुपयांच्या बनावट १३ नोटा असल्याचे निदर्शनास आले.
या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील अकोले हॉस्पिटलमधून मेडिक्लेमच्या पैसे भरताना अज्ञात व्यक्तीने दिलेल्या होत्या. या नोटा बनावट असल्याचा संशय असल्याने रत्नपारखे व बँकेच्या रोखपाल अंकिता गायकवाड यांनी शाखा व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिले. (latest marathi news)
या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांनी इंदिरानगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटांच्या सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांची शहानिशा केली जाणार आहे. त्यानुसार या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
"बँकेत आलेल्या भरणात ५०० रुपयांच्या १३ नोटा बनावट असल्याचा दावा बँकेचा आहे. त्या नोटांची सत्यता पडताळली जाणार आहे." - अशोक शेरमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.