निखिल रोकडे ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक : राज्य सरकार एकीकडे लोकप्रिय योजनांसाठी पैसे खर्च करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्यातील ठेकेदारांचे हजारो कोटी रुपये अडकले आहेत. अन्य योजनांमध्ये पैसे वळविल्यामुळे निधीची कमतरता असल्याने ठेकेदारांना थकीत रक्कम मिळू शकलेली नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ठेकेदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तब्बल पाच हजार कोटी रुपयांची बिले येणे बाकी आहेत. त्यापैकी अकराशे कोटी हे फक्त नाशिक जिल्ह्यातील आहेत. (5000 Crore Contractors are stuck in North Maharashtra situation)