नाशिक : जिल्ह्यात वार्षिक एक लाख रुपये कमावत असलेल्या महिलांना लखपती दीदी अशी ओळख मिळत आहे. यंदाच्या वर्षासाठी एक लाख ११ हजार महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असून, यांपैकी आतापर्यंत ५२ हजार महिलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी काम करीत आहे. यासाठी स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ या त्रिस्तरीय रचना महिलांच्या संस्था निर्मिती करून त्याद्वारे विविध उपजीविका वृद्धी व स्वयंरोजगार उभारण्यास प्रशिक्षित करून बँक व इतर मार्गान अर्थसहाय्य केले जात आहे. (52 thousand women became millionaires in district)