Nashik Dengue News : डेंगी बाधितांचे सव्वातीनशे अहवाल प्रलंबित

Nashik Dengue : जिल्हा रुग्णालयाकडे खासगी रुग्णालयांकडून आलेले रक्त नमुने डेंगी तपासणी किट नसल्याने प्रलंबित आहे.
Nashik Dengue Update
Nashik Dengue Updateesakal
Updated on

Nashik Dengue News : नाशिक शहरामध्ये डेंगीच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत असताना जिल्हा रुग्णालयाकडे खासगी रुग्णालयांकडून आलेले रक्त नमुने डेंगी तपासणी किट नसल्याने प्रलंबित आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत व पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयाला सूचना देऊनही दखल न घेतल्याने हलगर्जीपणासमोर आला आहे. शहरात डेंगीच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने दोन आठवड्यापूर्वी केंद्रीय पथक शहरांमध्ये दाखल झाले होते. (Nashik 5300 reports of dengue cases are pending )

डेंगी उत्पत्ती स्थाने तपासल्यानंतर महापालिकेला कानपिचक्या देण्यात आल्या. महापालिकेच्यावतीने जवळपास दोनशे पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकांच्या माध्यमातून डेंगीअळी निर्मिती साधने शोधणे बरोबरच घराघरांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे काम देण्यात आले आहे. महापालिका स्तरावरून डेंगी जनजागृती संदर्भात जमीन आसमान एक केले जात असताना दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे जिल्हा रुग्णालयाकडे जवळपास सव्वा तीनशे डेंगी तपासणी अहवाल प्रलंबित आहे. (latest marathi news)

Nashik Dengue Update
Nashik Dengue News : डेंगीच्या दंडात दुप्पट वाढ! नागरिकांना 500, बिल्डर्सला 10 हजार रुपये

रुग्णालयाकडे तपासणी किट नसल्याने डेंगीचा निश्चित आकडा समोर आलेला नाही पालकमंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात संदर्भ रुग्णालयात घेतलेल्या बैठकीत चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली होती त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे कीट संदर्भात मागणी करण्यात आल्यानंतर तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, कीट उपलब्ध झाल्यानंतर देखील जिल्हा रुग्णालयाकडून प्रलंबित अहवाल तपासले गेले नाही जिल्हा रुग्णालयाकडून प्रलंबित अहवाल तपासले गेले नाही. महापालिकेकडे डेंगीची जुनीच आकडेवारी असल्याने खरा आकडा अद्याप समोर येत नसल्याचे दिसून येत आहे.

साथीच्या आजारात वाढ

शहर साथीच्या आजाराने बेजार झाले आहे चार-पाच घरांमागे तापाचे रुग्ण आढळून येत आहे डेंगीने देखील कहर केला आहे. जुलै महिन्यात डेंगीच्या ३३४ रुग्ण आढळून आले जानेवारीपासून एकूण जवळपास साडेपाचशे रुग्ण डेंगीचे आढळून आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंगीच्या नावाखाली रुग्णांवर उपचार केले जात असून यातून आर्थिक झळ देखील रुग्णांच्या नातेवाइकांना सोसावी लागत आहे.

Nashik Dengue Update
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.