Nashik News : पवन नगर मैदानावरील 6 बाक चोरीला; चोरट्यांची शक्कल

Nashik : सिडकोत गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पवन नगर मैदानावर नागरिकांना बसण्यासाठी असलेले सहा लोखंडी बाक चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेले आहेत.
The bench thieves have stolen the fiber strips from the benches on the Pawan Nagar ground. Fiber strips carried away by thieves.
The bench thieves have stolen the fiber strips from the benches on the Pawan Nagar ground. Fiber strips carried away by thieves.esakal
Updated on

Nashik News : सिडकोत गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पवन नगर मैदानावर नागरिकांना बसण्यासाठी असलेले सहा लोखंडी बाक चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेले आहेत. चोरट्यांनी बाक चोरून नेताना फायबरच्या फळ्या काढून मैदानावरच सोडून देत लोखंडी साचा मात्र घेऊन गेले आहेत. दरम्यान, या मैदानावर रात्रीच्या वेळी मद्यपी, चोरट्यांचा वावर असल्याने याठिकाणी रात्री पोलिस गस्तीची मागणी सातत्याने केली जाते. (nashik 6 benches stolen from Pawan Nagar ground marathi news)

परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवननगर मैदानावर दररोज हजारो नागरिक पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जॉगिंगसाठी येतात. महिलांचा हास्य क्लबही असतो. नागरिकांच्या सोयीसाठी या मैदानावर ग्रीनजीमचे साहित्यही बसविलेले आहे. या मैदानावर नागरिकांनी स्वखर्चातून वृक्षारोपण केले असून, वृक्षप्रेमींकडून त्यांची देखभालही केली जाते.

ग्रीन जीम बसविलेल्या जागेवरच नागरिकांना बसण्यासाठी बाक ठेवली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळच्या वेळी जॉगिंगनंतर वा ग्रीन जीमचा व्यायाम केल्यानंतर काही वेळ या बाकांवर बसतात. मात्र, अज्ञात चोरट्यांनी येथील सहा बाकेच रात्रीच्या वेळी चोरून नेली आहेत. सकाळी मैदानावर आलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आली.

मद्यपी, चोरट्यांचा वावर

पवन नगर मैदानावर दुपारच्यावेळी प्रेमीयुगुल आडोशाला बसलेले असतात. नागरिकांनी हटकल्यास त्यांच्याकडून दादागिरी केली जाते. काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, पोलिसांनी अचानक येऊन प्रेमीयुगुलांना दणके दिले होते. (Latest Marathi News)

The bench thieves have stolen the fiber strips from the benches on the Pawan Nagar ground. Fiber strips carried away by thieves.
Nashik News : आडगाव येथील प्रभाग दोनमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

मात्र रात्रीच्यावेळी मद्यपी आणि चोरट्यांचा वावर कायम आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार पोलिस गस्तीची मागणी केली आहे. मात्र त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. गस्तीवरील पोलिस मैदानात न येता बाहेरून जातात. त्यामुळे स्टेडिअम आणि आडोशाला बसून मद्यपींच्या पार्ट्या सर्रास रंगलेल्या असतात.

''मैदानावर नेहमी टवाळखोरांचा वावर असतो. त्यांना हटकल्यास दादागिरी केली जाते. रात्रीच्यावेळी मद्यपींच्या पार्ट्या चालतात. मद्याच्या बाटल्या फोडून ठेवतात. पोलिसांकडे गस्तीची मागणी केली जाते, परंतु गस्त होत नसल्याने टवाळखोरांचे फावते.''- सुभाष गायकवाड, ज्येष्ठ नागरिक.

''दुपारच्यावेळी टवाळखोरांकडून ग्रीन जीम साहित्याचे नुकसान केले जाते. पोलिस गस्तीला येतात परंतु कडक कारवाई होत नाही. त्यामुळे टवाळखोरांवर वचक बसत नाही. पोलिसांनी कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे.''- साहेबराव दळवी, ज्येष्ठ नागरिक.

''रात्रीच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. मद्याच्या बाटल्या फोडून ठेवतात. चोरट्यांनी बाकेच चोरून नेले. पोलिसांनी रात्रीच्यावेळी नियमित गस्त करून कारवाई केली पाहिजे.''- सुभाष चव्हाण, नागरिक.

''मैदानावर चोरट्यांचा नेहमी उपद्रव असतो. रात्रीतून बाके चोरून नेली. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. ग्रीन जीम साहित्याचेही नुकसान करतात. पोलिसांनी कारवाई करायचा पाहिजे.''- गोपीचंद कुमावत, नागरिक.

The bench thieves have stolen the fiber strips from the benches on the Pawan Nagar ground. Fiber strips carried away by thieves.
Nashik News : पानवेली काढण्यासाठी प्रशासनाची लगबग; गोदापात्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर विसर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.