Nashik News : बापरे, एक्साईजकडून 6 मद्यपींनी घेतले परवाने! वाईन शॉप बाहेर मद्य खरेदीसाठी तोबा गर्दी

Nashik : श्रावणमासाला सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने शनिवार अन्‌ रविवारी मद्यपींना पर्वणीच मिळालेली आहे.
wine news
wine newsesakal
Updated on

Nashik News : श्रावणमासाला सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने शनिवार अन्‌ रविवारी मद्यपींना पर्वणीच मिळालेली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी वाईन शॉपबाहेर मद्याचे ‘खंबे’ खरेदीसाठी तळीरामांची गर्दी होती. तर, दुसरीकडे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवघ्या ६ जणांनी परवाने घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी (ता. ४) आषाढी अमावस्या असून सोमवारपासून श्रावणमास प्रारंभ होतो आहे. (6 person Liquor License obtained from Excise in city )

तळीरामांनी मात्र शनिवारपासूनच पार्टी सुरू केली आहे. मद्यपान करणार्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (एक्साईज) परवाने दिले जातात. यात जसे वार्षिक, आजीवन परवाने दिले जातात तसेच, एका दिवसांसाठीचेही परवाने दिले जातात. याचप्रमाणे, हॉटेल्समध्ये ओल्या पार्ट्या करण्यासाठीही एक्साईजकडून परवाने दिले जातात. मात्र, गटारी अमावस्येला होण्याऱ्या ओल्या पार्ट्यांसाठी हॉटेल्सकडून कोणत्याही प्रकारचे परवाने घेण्यात आलेले नाहीत. (latest marathi news)

wine news
Nashik News : वर्दळीच्या सिग्नलवर भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ! भिक्षेसाठी लहान मुलांबरोबर ज्येष्ठांचाही होतोय वापर

तर २५ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील अवघ्या ६ जणांनी मद्यपानाचा परवाना एक्साईज विभागाकडून घेतल्याचे समोर आले आहे. विशेषत: शहरातील बहुतांशी वाईन शॉपसमोर शनिवारी (ता. ३) दिवसभर मद्यपींकडून मद्याच्या खरेदीसाठी रेलचेल दिसून आली होती. रविवारी (ता.४) देखील मद्यपींची अशीच रेलचेल हॉटेल्स, बिअरबार अन्‌ वाईन शॉपसमोर राहील.

wine news
Nashik News : सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जनजागृती पर फलकांची मात्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.