Nashik News : सिन्नरला 30 गावांचे शेतशिवारात कॉक्रीट रस्ते; रस्त्यासाठी 60 कोटी

Nashik : सिन्नर तालुक्यातील ३० हुन अधिक गावांचा शेतशिवार काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे.
Fund
Fund esakal
Updated on

Nashik News : सिन्नर तालुक्यातील ३० हुन अधिक गावांचा शेतशिवार काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४० किमी लांबी असलेले ६० कोटी २३ लाख किमतीचे ४ रस्ते मंजूरी मिळाली आहे. विशेष म्हणजे रस्त्यासोबतच १० वर्षाच्या देखभालीसाठी आताच निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मतदार संघातील रस्त्यांसाठी ७१ कोटींहून अधिकचा निधी मंजूर झाला होता. ( 60 crores for concrete roads in fields of 30 villages in Sinnar)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन चार रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागातील शेतीवाडीही या रस्त्यांना जोडली जाणार आहे. सुमारे ४० किमीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते आता ३० हुन अधिक गावांना जोडले जाऊन ही गावे मुख्य रस्त्यांना जोडली जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच त्यांचा प्रवासाचा वेळही वाचणार आहे.शिवाय शेतातील शेतमाल शेतकऱ्यांना आता थेट बाजार समितीत कमी वेळेत पोहचवता येणार आहे.(latest marathi news)

Fund
Nashik News : नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपावर फुली! राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार भरती

या रस्त्यांना होणार फायदा..

या रस्त्यांची रुंदी ३.७५ मीटर व गावांजवळ ती ५.५० मीटर इतकी असणार आहे. पांगरी बु ते धारणगाव या ६.१३ किमी रस्त्यासाठी८ कोटी ६६ लाख १३ हजार रुपये, कोमलवाडी- वडांगळी शिवार- चोंढी- ब्राम्हणवाडे (सिन्नर तालुका हद्दीपर्यंत) या १०.१८० किमी रस्त्यासाठी १५ कोटी ७९ लाख६८ हजार रुपये,मानमोडा-दगडवाडी- एकलहरे- कीर्तांगळी -कोमलवाडी, घंगाळवाडी-हिवरगाव-म्हाळसाकोरे (सिन्नर तालुका हद्दीपर्यंत) या १३.०८ किमी साठी १९ कोटी ५६ लाख ६६ रुपये, विघ्नवाडी-झापेवाडी-मीरगाव सायाळे-सायाळे-चिंचोली (सिन्नर तालुका हद्दीपर्यंत) या १०.६१० किमी रस्त्यासाठी १५ कोटी ५० लाख ७१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.आवश्यक तिथे पुलांची कामेही होणार आहेत. तसेच १० वर्षे या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ८२ लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

Fund
Nashik News : आयटी इंजिनिअर तरुणानी उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com