लासलगाव : आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या मक्याची बंपर आवक विक्रीसाठी येत आहे. आठवड्याभरात (१३ नोव्हेंबरअखेर) ६० हजार क्विंटल मक्याची आवक झाली आहे. कांद्याबरोबर मक्याचीही बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती उदयास येत आहे. मोठ्या प्रमाणात मक्याची आवक येत असल्याने बाजार समितीच्या आवारात मक्याचे ढीग पाहायला मिळत असल्याने बाजार समितीच्या आवाराला पिवळ्या सोन्याने झळाळी आल्याचे चित्र दिसत आहे. (60 thousand quintals of maize production in Lasalgaon market )