Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024esakal

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

Lok Sabha Election : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २०) जिल्ह्याचा पारा ४०.५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेला असतानाही मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखविला.
Published on

Nashik Lok Sabha Election 2024 : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २०) जिल्ह्याचा पारा ४०.५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेला असतानाही मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखविला. यामुळे नाशिकमध्ये सरासरी ६१ टक्के, तर दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नरमध्ये सर्वाधिक ६ टक्के, तर दिंडोरी लोकसभेतील कळवण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६५ टक्के मतदान झाले. (Nashik 61 percent of voters exercised their right )

दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स सीलबंद करून अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये ठेवले आहेत. किरकोळ अपवाद वगळता दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लोकसभेत ३१ उमेदवार, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात होते.

नाशिकमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत रंगली. मात्र, अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी अखेरच्या क्षणी प्रचारात आघाडी घेतल्याने तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले. नाशिक शहरात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या. सिन्नरमध्ये तर सकाळपासून सुरू झालेला मतदारांचा उत्साह सायंकाळपर्यंत टिकून होता. शहरासह ग्रामीण भागातील मतदारही उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले.

त्यामुळे सायंकाळी पाचपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ५२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावल्याचे दिसून आले. शहरातील चारही विधानसभा मतदारसंघांत मतदारांचा उत्साह दुपारनंतर कमी झाला. जुन्या नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात हमरीतुमरी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सिडकोतही असेच प्रकार घडले. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये शिवसेनेचाच उमेदवार! खासदार गोडसे यांनीही थोपटले दंड

त्या व्यतिरीक्त शांततेत मतदान पार पडले. घोटी व इगतपुरीत मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. नाशिक तालुक्यातील मतदार दुपारनंतर बाहेर पडले. मतदारांनी सायंकाळी सहापर्यंत उत्साह दाखविल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ६१ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान सिन्नरमध्ये झाले. त्यापाठोपाठ इगतपुरी (६६ टक्के), देवळाली (६१ टक्के), नाशिक पश्‍चिम (६० टक्के), नाशिक मध्य (५७ टक्के), नाशिक पूर्वमध्ये (५७ टक्के) मतदान झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले; तर अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर पूर्णवेळ लक्ष दिले. त्यांच्यासह पोलिस, वैद्यकीय पथकांच्या सहकार्यामुळे प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत झाली. मतदानाची अंतिम टक्केवारी मंगळवारी (ता. २१) निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृतरीत्या जाहीर करणार आहेत.

दिंडोरीत मतदारांच उत्साह

दिंडोरीत २०१९ च्या निवडणुकीत ६५.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा यात काहीशी वाढ झाली आहे. सर्वाधिक मतदान दिंडोरी विधानसभा मतदारसंघात झाले. त्यापाठोपाठ दिंडोरीत मतदान झाल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बालेकिल्ल्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला असतानाही भर दुपारी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवार अनिश्चिततेमुळे महायुतीमधील इच्छुकांची घालमेल

निफाड, चांदवड व येवल्यातील काही शेतकरी मतदारांनी कांद्यावरील रोष व्यक्त करण्यासाठी मतदान केंद्रावर कांद्याच्या माळा घालत मतदान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. असे असले तरी या शेतकऱ्यांनी केंद्राबाहेर घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. सायंकाळी पाचपर्यंत ५७ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सहापर्यंत मतदानाची वेळ असल्याने मतदानात वाढ होणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तासनिहाय मतदानाची टक्केवारी-

विधानसभा मतदारसंघ.... ७ ते ९...... ७ ते ११..... ७ ते १..... ७ ते ३.... ७ ते ५.... ५ नंतर मतदान संपेपर्यंत

नांदगाव....... ६.५१........ १८.६८..... ३२.०४...... ४१.८८.....५२.०८....५५.०१

कळवण-सुरगाणा..... ३.०५......... १९.२५...... ३५.४५....... ५३.८४.....६२.२८....६३.४५

चांदवड-देवळा..... ८.०८........ २०.८८........ ३५.०५...... ४७.५७.....५९.१५.....६६.०२

येवला...... ६.०४......... २०.०२........ ३२.०८..... ४०.६७........५०.३३....६३.०२

निफाड.... ६.०१........ २०.०१...... ३१.६१....... ४४.३७.........५७.१....६२.७६

दिंडोरी-पेठ.... ७.०५........ १८.०९...... ३३.०१......... ४८.०२.......६२.०३....६६.०

नाशिक लोकसभा मतदारसंघ तासनिहाय मतदानाची टक्केवारी-

मतदारसंघ..... ७ ते ९....... ७ ते ११........ ७ ते १....... ७ ते ३......... ७ ते ५........५ नंतर मतदान संपेपर्यंत

सिन्नर...... ७.०७.......... २०.१६........ ३३.००........ ४५.०३.......५८.७....६८

नाशिक पूर्व... ६.४८....... १६.८१......... २६.७२....... ३८.१२........४९.२३....५६

नाशिक मध्य.... ७.१२..... ११.१५....... २९.७६........ ४०.२१.....५१.०१....५७

नाशिक पश्चिम.... ६.२८....... १६.२४........ २४.७२.... ३२.२८......४५.०८...६०

देवळाली....... ५.०३......... १६.०५......... २८.३०........ ४०.०२.......४९.८....६१

इगतपुरी..... ५.६८........ १७.३३......... ३१.०७......... ४४.७७.......५७.११....६६

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, भास्कर भगरेंसह 5 अर्ज दाखल

मेहुणेतील मतदारांचा बहिष्कार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावच्या मतदारांनी सामूहिकरित्या मतदानावर बहिष्कार टाकला. यात मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नितीन देवरे यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी झाडी- चणकापूर धरणातून पाणीपुरवठ्याची योजना सुरू होत नाही, तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील, अशी भूमिका घेतली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनीही आपली मागणी मान्य केली जाईल. परंतु, आपण मतदान करीत लोकशाहीच्या आपल्या उत्सवात सहभागी होत आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन केलेु, परंतु उपयोग झाला नाही.

२०१९ च्या लोकसभेतील मतदान

नाशिक लोकसभा- ५९.४८ टक्के

दिंडोरी लोकसभा- ६५.६५ टक्के

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.