Nashik NMC : महापालिकेतील 624 पदांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविणार

Nashik News : औरंगाबाद महापालिकेचा आस्थापना खर्च अधिक असला तरी खर्च मर्यादा शिथिल करून तेथे वैद्यकीय व अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : औरंगाबाद महापालिकेचा आस्थापना खर्च अधिक असला तरी खर्च मर्यादा शिथिल करून तेथे वैद्यकीय व अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील ६२४ पदांच्या भरतीलादेखील परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेकडून शासनाला पाठविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमवेत नुकतीच नाशिक महापालिकेच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली. (624 Posts in Municipal Corporation Will send recruitment proposal)

या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या नगर विकास विभागाला सूचित केले. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च अधिक असल्याने रिक्त पदांची भरती करता येत नाही. मात्र कोविड काळात महापालिकेने अतितातडीचे बाब म्हणून वैद्यकीय अग्निशमन व अभियांत्रिकी विभागातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली.

एकूण ७०६ पदे भरली जाणार होती, मात्र वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळण्यात आलीत. त्यामुळे उर्वरित ६२४ पदे भरण्यासाठी टीसीएस कंपनीसमवेत महापालिकेचा करार झाला. २६ संवर्गातील पदे भरण्यासाठी तयारी झाली असताना डिसेंबर २०२३ पर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने दिलेली मुदत संपुष्टात आली. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik News : कडवा धरणातून तात्काळ आवर्तन सोडावे; आमदार कोकाटे यांची मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांना विनंती

त्यानंतर लोकसभा व विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे वैद्यकीय व अग्निशमन दलातील रिक्त पदांच्या संदर्भात निर्णय झाला नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रिक्त पदांच्या भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या.

त्याचाच एक भाग म्हणून अतिमहत्त्वाच्या वैद्यकीय अग्निशमन विभागातील ६२४ रिक्त पदांच्या नोकरभरतीला चालना देण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्च मर्यादा शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.

NMC Nashik
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.