Nashik Medical College: वैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारणीला गती; 632 कोटी 97 लाखांच्‍या आराखड्यास प्रशासकीय मान्‍यता

Medical College : शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय पूर्णतः शासनाच्या अखत्यारीत घेण्यास राज्‍य शासनाने मान्‍यता दिली.
Fund
Fund esakal
Updated on

नाशिक : येथील शासकीय वैद्यकीय पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय पूर्णतः शासनाच्या अखत्यारीत घेण्यास राज्‍य शासनाने मान्‍यता दिली. महाविद्यालयाचे नाव ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक’ असे करण्यासदेखील मान्‍यता दिली. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प राज्‍य शासनातर्फे उभारला जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली होती. हे महाविद्यालय केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून केले जाणार होते.(632 Crore 97 Lakh scheme to speed up construction of Medical Degree College Administrative Approval )

मात्र कामाला गती मिळत नसल्याने, हे काम राज्‍य शासनाकडे वर्ग करण्याबाबत मंत्री भुजबळांनी पाठपुरावा केला. महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था ही संस्था आरोग्य विद्यापीठाच्‍या नियंत्रणाखाली ठेवण्यास मान्यता दिली आहे. पदवी व पदव्‍युत्तर पदवी महाविद्यालयांसाठी मौजे म्हसरूळ, भूमापन क्रमांक व उपविभाग २५७ येथील १४.३१ हेक्‍टर आर जागा निश्चित केलेली आहे. पदवी महाविद्यालय, संलग्नित रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा पूर्ण खर्च राज्य शासनामार्फत केला जाईल. पदव्युत्तरच्‍या इमारत बांधकामाचा खर्च राज्य शासन ६० टक्‍के, विद्यापीठ ४० टक्‍के या प्रमाणात केला जाईल.

पदभरतीला मान्‍यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे पदवी, पदव्‍युत्तर महाविद्यालयासाठी आवश्यक पदे भरली जातील. पदव्‍युत्तरसाठी पदनिर्मिती विद्यापीठ करेल. पदवीसाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल करून इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांप्रमाणे आवश्यक पदनिर्मिती, पदभरतीस मान्यता दिली.

तथापि, पदव्‍युत्तरच्‍या अध्यापकांना पदवीपूर्व विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य व रुग्‍णसेवा बंधनकारक असेल. पदव्युत्तरकरिता नियुक्त शिक्षकांचे वेतन, निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन शासनाद्वारे मंजूर सहाय्यक अनुदानातून केले जाईल. वर्ग ३, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांचा खर्च विद्यापीठामार्फत केला जाईल. संस्थेसाठीचा इतर आवर्ती खर्च पूर्णपणे विद्यापीठ करेल. (latest marathi news)

Fund
Medical College : वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार रामभरोसे; महापालिकेने झटकले हात

याबाबत मिळाली मान्‍यता

-पदवी व पदव्युत्तरसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने तात्पुरत्या स्वरूपात निःशुल्क वापरणे.

-पदवी, पदव्‍युत्तरसाठी संलग्नित रुग्णालय अधिष्ठाताच्‍या नियंत्रणाखाली ठेवणे.

-दोन्‍ही महाविद्यालयांसाठी सुमारे रुपये ६३२.९७ कोटी निधी उपलब्धता, खर्चासाठी मान्‍यता.

-आवश्यकतेनुसार पूरक मागणीद्वारे निधी उपलब्ध करणार.

-आवर्ती खर्चासाठी चौथ्या वर्षाप्रमाणे पुढील प्रत्येक वर्षी ४९ कोटी ७२ लाखा निधी उपलब्‍ध करून देणार.

-पदव्युत्तरच्या बांधकामासाठीचा ४० टक्के खर्च आरोग्य विद्यापीठ करणार.

-पदवीसाठी नियमित अर्थसंकल्पीय तरतूद होईपर्यंत, पदव्युत्तरसाठी नियुक्त शिक्षकांचे वेतन, निवासी डॉक्टरांचे विद्यावेतनासाठी शासनामार्फत सहाय्यक अनुदान उपलब्ध होईपर्यंत पदवी महाविद्यालयासाठीचा आवर्ती खर्च, पदव्‍युत्तरसाठी नियुक्त शिक्षकांचे वेतन, निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन विद्यापीठ अदा करणार.

-शासनामार्फत पर्याप्त निधीची तरतूद होऊन निधी उपलब्ध झाल्यानंतर विद्यापीठामार्फत वेतन, विद्यावेतनासाठी केलेल्‍या खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल.

-पदवी महाविद्यालय संलग्नित रुग्णालयासाठी नियमित अनुदान उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालय कार्यान्वित ठेवण्यासाठीचा आवर्ती, अनावर्ती खर्च जिल्हा रुग्णालयाच्‍या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाणार.

-पदवी, पदव्‍युत्तरचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चितीसाठी समिती गठित.

Fund
Nashik Medical College : सर्व वैद्यकीय महाविद्यालये वर्षभरात ‘NAAC’ च्‍या प्रक्रियेत : प्रति-कुलगुरू निकुंभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.