Nashik: शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याचे 656 कोटी! जिल्ह्यातील मका, कापूस उत्पादकांना दिलासा; 6 जिल्ह्यांसाठी 1927 कोटी मंजूर

Latest Agriculture News : मका व कापूस उत्पादकांच्या खात्यावर गुरुवारी (ता. १०) सायंकाळपासून पीकविम्याची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली.
Crop Insurance
PM Crop Insurance Scheme nanduraesakal
Updated on

Nashik : गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सहा जिल्ह्यांसाठी एक हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये मिळणार आहेत. मका व कापूस उत्पादकांच्या खात्यावर गुरुवारी (ता. १०) सायंकाळपासून पीकविम्याची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली. (656 crores of crop insurance on account of farmers)

एक रुपयात पीकविमा योजना लागू झाल्यानंतर २०२३ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पाच लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला. जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ मध्ये प्रचंड दुष्काळ पडला आणि उगवलेली पिके जागेवरच करपली. शासकीय समितीकडून या पिकांचा पंचनामा झाला.

अधिकाऱ्यांनीही ही परिस्थिती राज्य शासनाला कळवली होती. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ११० टक्क्यांपर्यंतची नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यापुढील भरपाई राज्य शासनाने देण्याचा ‘बीड पॅटर्न’ नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी राबविण्याची शिफारस केली.

त्यानुसार राज्य शासनाने या सहा जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांसाठी एक हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले. कृषी विभागाने भरपाईचे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमत: मका व कापूस उत्पादकांच्या खात्यावर क्षेत्रनिहाय पैसे वर्ग होत असल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले आहेत. त्याची शेतकऱ्यांनी बँकेत खातरजमाही केली, तर खात्यावर पैसे वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. (latest marathi news)

Crop Insurance
Loha Assembly Elections 2024: ठाकरे गटाच्या इच्छुकांमध्ये चार ‘स्वामीं’चा बोलबाला !

कांदा उत्पादकांना प्रतीक्षा

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना पीकविमा नाकारण्यात आला. दुसरीकडे राज्य शासनाने मंजूर केलेले प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदानही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादकांना मदतीची प्रतीक्षा आहे.

जिल्हानिहाय मिळणारी मंजूर विमा रक्कम

नाशिक : ६५६ कोटी रुपये

जळगाव : ४७० कोटी

अहिल्यानगर : ७१३ कोटी

सोलापूर : २.६६ कोटी

Crop Insurance
Nashik Ashram Shala Problems : आदिवासींसाठी दर्जेदार शिक्षण कागदावरच! वैतरणा आश्रमशाळेत शिक्षण अन्‌ निवास एकाच खोलीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.