Nashik News : सिन्नरमधील 40 रस्त्यांचे भाग्य उजळणार; तब्बल 70 कोटींचा निधी मंजूर

Nashik : आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्यांसाठी ७० कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे.
fund
fundesakal
Updated on

Nashik News : विधानसभा मतदारसंघातील ४० पेक्षा जास्त रस्त्यांचे भाग्य उजळणार असून त्यासाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्यांसाठी ७० कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. सिन्नर तालुक्यातील व टाकेद गटातील आदिवासी भागात मुख्यत्वे हे रस्ते होणार आहेत. शिवाय तालुक्यातील बिगर आदिवासी भागातील बऱ्याच रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. ( 70 crores of funds approved to brighten fate of 40 roads in Sinnar )

७० कोटीच्या रस्ते कामात शुक्लतीर्थ खेड मांजरगाव रस्ता, खेड ते भैरवनाथ मंदिर रस्त्यांमध्ये संरक्षक भिंतीचे काम, खेड ते इंदोरे रस्ता दुरुस्ती, आगासखिंड-औंढेवाडी रस्ता ते इतर जिल्हा मार्ग १७२ पर्यंतची सुधारणा करणे, घोरवड ते लहवित रस्त्याची सुधारणा करणे, घोटी खुर्द ते साकुर रस्त्याची सुधारणा करणे, कवडदरा ते घोटी खुर्द रस्त्याची सुधारणा, कवडदरा ते भरवीर खुर्द रस्ता, भंडारदरावाडी ते भरवीर बुद्रुक रस्ता सुधारणा, इंदोरे ते जाधव वस्ती रस्ता सुधारणा, गिर्हेवाडी ते बेलू तालुका हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा, इंदोरे ते देवाची वाडी रस्त्याची दुरुस्ती, आधारवड ते वासाळी रस्ता सुधारणा, सोनांबे डगळे वस्ती ते चंद्रपूर खापराळे रस्ता सुधारणा, चंद्रपूर, खापराळे, सोनांबे, आडवाडी, रस्त्याची सुधारणा करणे साकुर ते शेनीत रस्ता, निनावी, मेघाळवाडी गिरेवाडी फाटा ते आगासखिंड रस्ता सुधारणा, निनावी महादेववाडी ते गिर्हेवाडी रस्ता, बारशिंगवे ते परदेशवाडी रस्ता दुरुस्ती, टाकेद ते तातळवाडी रस्ता दुरुस्ती, भंडारदरावाडी ते फोडसेवाडी झरी नाला रस्ता, भरवीर खुर्द ते धामणगाव चौरेवाडी रस्ता दुरुस्ती, आगासखिंड ते औंढेवाडी ते इतर जिल्हा मार्ग रस्ता, घोरवड ते लहवीत, घोरवड म्हसळवाडी ते प्रमुख जिल्हा मार्ग यांचा समावेश आहे. (latest marathi news)

fund
Nashik News : जिल्ह्याचा 34 हजार 800 कोटींचा पत आराखडा; जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते पुस्तिकेचे उद्‌घाटन

याबरोबरच बोरखिंड प्रमुख जिल्हा मार्ग, धोंडबार ते प्रमुख जिल्हा मार्ग, शिवडा ते भैरवनाथ मंदिर ग्रामीण मार्ग, शिवडा ते ठाकूरवाडी धोंडबार रस्ता, पांढुर्ली ते औंधवाडी रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग २६ ते आगासखिंड घोरवड रस्त्याची सुधारणा, घोरवड ते धोंडेवाडी रस्त्याची सुधारणा, घोरवड ते जामगाव वाडी रस्ता, औंढवाडी ते औंढवाडी फाटा रस्ता, धोंडबार तासदरा ते ठाकूरवाडी रस्ता दुरुस्ती, बोरखिंड ते डावखरे वस्ती रस्ता, बारागाव पिंप्री ते पाटपिंप्री-तळवाडे-रामनगर रस्त्याची सुधारणा, वडांगळी ते निमगाव-सिन्नर रस्त्याची सुधारणा, सिन्नर नायगाव-जायगव रस्त्याचे काँक्रीटीकरण, खडांगळी येथे राज्य मार्ग ३५ ते मेंढी चौफुली पर्यंत व सोमठाणे सबस्टेशन ते सांगवी आदी रस्त्यांचा यात समावेश आहे.

''मतदारसंघातील सर्वच रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण वा काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांचीही कामे लवकरच सुरू होतील व नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.''- ॲड. माणिकराव कोकाट, आमदार

fund
Nashik News : जोरदार पाऊस नसतानाही 3 वाडे कोसळले! अनेक वर्षापासून समस्या ‘जैसे थे’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.