Nashik News : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत रविवारी (ता.१७) निरक्षरांची परीक्षा जिल्ह्यात पार पडली. या परीक्षेत प्रविष्ट ३३ हजार २१४ पैकी २४ हजार ९८४ निरक्षरांची परीक्षा दिली. उपस्थितीचे ७०.२५ टक्के राहिली. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातून निरक्षणाचे सर्वेक्षण करण्यात आले. २०२७ पर्यंत शंभर टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. (Nashik 70 percent attendance in Navbharat literacy exam marathi news)
जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ साठी ५३ हजार २३४ निरक्षर नोंदणीचे उद्दिष्ट होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील साक्षरता कार्यक्रमासंबंधी टास्कनुसार हे सर्वेक्षण होते. जिल्ह्यात उल्हास अॅपद्वारे ३३ हजार २१४ निरक्षरांची नोंदणी झाली होती. त्यांना शिकण्यासाठी ३ हजार ३२१ स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती.
या सर्वेक्षणानंतर सर्व तालुक्यांत साक्षरतेचे वर्ग झाले. या वर्गात शिकलेल्यांची रविवारी परीक्षा घेतली. त्यानुसार २४ हजार ८३१ जणांनी परीक्षा दिली. जिल्ह्यात २ हजार ७५१ केंद्रांवर ही परीक्षा झाली. दीडशे गुणांसाठी ही परीक्षा घेतली. येत्या दोन-तीन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून उत्तीर्णांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. (latest marathi news)
यापूर्वी दिलेल्या परीक्षेच्या बातमीला जोड म्हणून घ्यावे
शिंदे गावात शाळेचा बहिष्कार, शिक्षण विभागाने बजावली नोटीस शिंदे गाव येथील शाळेने निरक्षरांच्या परीक्षेचे आयोजन करण्यास नकार दिला. यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळेला नोटीस बजावली असून खुलासा करण्यास सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. जिल्ह्यात एकीकडे परीक्षा सुरळीत पार पडलेली असताना शिंदे गावातील शाळेने परीक्षेवर बहिष्कार घालत ही परीक्षा होऊ दिली नाही तर शाळेच्या या भूमिकेविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारताना नोटीस बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.