Pink E-Rickshaw : नाशिक शहरात 700 महिलांना मिळणार ‘पिंक ई-रिक्षा’; महिला व बालकल्याण विभागाची योजना

Pink E-Rickshaw : बालविकास विभागातर्फे शहरातील ७०० महिलांना पिंक ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत.
Pink E-Rickshaw
Pink E-Rickshaw esakal
Updated on

नाशिक : महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे शहरातील ७०० महिलांना पिंक ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. त्यात रिक्षा चालवणे, स्कूल व्हॅन आदी चारचाकी वाहने चालवण्यात महिला पारंगत झाल्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. (700 women will get pink e rickshaw in city )

याशिवाय www.nashik.gov.in या संकेतस्थळावर, महापालिका, नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रातही अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.

लाभासाठी पात्रता

-लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी

-२० ते ४० वर्षे वय आवश्यक

-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३ लाखांपेक्षा अधिक नसावे

-विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह,बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य

-ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के रक्कम बँक कर्ज व २० टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा याप्रमाणे असून १० टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वत: भरावी

-कर्जाची परतफेड लाभार्थीने ५ वर्ष (६० महिने) कालावधी

-योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल (latest marathi news)

Pink E-Rickshaw
Pink Auto Rickshaw: ‘पिंक रिक्षा’चा पहिला मान नाशिकला! उपक्रम 4 वर्षांनी ठरणार फलदायी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.