Nashik ZP School : जिल्हा परिषदेच्या ५८ प्राथमिक शाळांना ७२ नवीन वर्गखोल्या मिळणार असून, १२५ शाळांची दुरुस्ती होणार आहे. शिक्षण विभागाच्या या नियोजनात सत्ताधारी मालेगाव व नांदगाव तालुक्यांत सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी वर्गखोल्या, दुरुस्तीसाठी तब्बल ३० कोटींहून अधिक निधी देण्यात आला होता. यंदा मात्र यात घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त होत असतो. (72 new classrooms in zilla parishad school )