Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये नव्याने ७५ दुचाकी वाहने सामील झाली आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वाहनांना शनिवारी (ता. २०) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. (Nashik 75 two wheelers join fleet of Rural Police Force)
आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. २०) पार पडला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाअंतर्गत ४० पोलीस ठाणे असून ८ उपविभागीय कार्यालय आणि नाशिक व मालेगाव येथे अपर अधीक्षक कार्यालय आहे. डायल ११२ योजना कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी वाहनांची आवश्यकता होती. (latest marathi news)
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधीक्षक कार्यालयाने दुचाकी वाहनांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार, ७५ दुचाक्या अधीक्षक कार्यालयासाठी प्रदान करण्यात आल्या. यात ४५ होंडा शाईन तर, ३० पल्सर दुचाक्या वाहने आहेत. या वाहनांमुळे पोलिसांना ग्रामीण भागात गस्त करणे आणि डायल ११२ वर आलेल्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
अधीक्षक कार्यालयाकडे यामुळे १७० वाहने झाली आहेत. यावेळी मुख्यालयाचे उपअधीक्षक नितीनकुमार गोकावे, उपअधीक्षक बापूराव दडस, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय करे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता चौधरी यांच्यासह अंमलदार, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.