Milk Producer : दूध उत्पादकांना 77 कोटी 49 लाखांचे अनुदान! नाशिक विभागातील 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांना लाभ

Nashik News : राज्य सरकारने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
milk Producer
milk Produceresakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य सरकारने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यावर ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागातील एक लाख २९ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. (77 crore 49 lakh subsidy to milk producers)

या योजनेपासून वंचित राहिलेल्या उत्पादकांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच, नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणत: एवढेच दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुग्ध विकास विभागाला नवीन शासकीय निर्णयाची प्रतीक्षा लागली असून, त्यानंतर अंमलबजावणी होईल. दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यस्थितीतील गायीचे दूध २७ ते ३० रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होते.

हा दर गृहित धरून राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची विधिमंडळात घोषणा केली. यापूर्वीही त्यांनी या उत्पादकांना अनुदान दिले आहे. विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील एक लाख २९ हजार ३१९ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

त्यांना ७७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. विभागातील पाच लाख २६ हजार ५१९ गायींची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे करण्यात आली होती. या योजनेनंतर पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे ‘टॅगिंग’ करण्याची प्रक्रिया गतिशील केली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल, यादृष्टीने पाऊले उचलली.

milk Producer
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

दूध देणाऱ्या सर्वच जनावरांचे टॅगिंग पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. नरवाडे यांनी सांगितले. पशुधनाची माहिती पोर्टलवर अपडेट करून १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. २६ मार्चपासून ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले होते. आता पोर्टल सुरू झाले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी योगेश नागरे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने गायीच्या दूध विक्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी व दूध उत्पादकांना १ जुलैपासून अनुदान देण्याची नव्याने घोषणा केल्याने या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचे दर किती राहणार, अनुदानाचे निकष काय असतील, यासंदर्भात शासन निर्णय प्राप्त झाल्यावर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.

विभागात ९७ दूध संकलन केंद्रे

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण ९७ सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्प आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ७४ दूध संघ आहेत. त्यापाठोपाठ नाशिक (१८), जळगाव (२), धुळे व नंदुरबार याठिकाणी (३) दूध संघ आहेत.

milk Producer
Nashik News : उमेदवारी अर्ज विक्री, स्‍वीकृती आजपासून; नाईक शिक्षण संस्‍था निवडणूक

"जानेवारी ते मार्चमधील अनुदानापासून वंचित राहिलेल्या दूध उत्पादकांनी संबंधित (एलडीओ) सहकारी दूध संघाशी संपर्क करावा. जास्तीत जास्त उत्पादकांनी अनुदानाचा लाभ घ्यावा. प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क करून १५ जुलैपर्यंत आपली माहिती अपलोड करावी." - श्रीकांत शिरपूरकर, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक

जिल्हानिहाय गोषवारा

जिल्हा.........दूध लिटर............मिळालेले अनुदान

अहमदनगर....१३,८६,५४,१९४.....६८ कोटी ८९ लाख ८० हजार ३१०

नाशिक........१,३९,७८,२६७.........६ कोटी ७६ लाख ८३ हजार २७०

धुळे.............४,१९,१७५.............१९ लाख ६७ हजार १३५

जळगाव........३३,८२,४५४...........१ कोटी ६३ लाख ६८ हजार ०३०

एकूण.........१५,६४,३४,०८९.....७७ कोटी ४९ लाख ९८ हजार ७४५

milk Producer
Nashik News : रोप खरेदीसाठी नागरिकांची पावले नर्सरीकडे; 3 महिन्यात लाखोंची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.