येवला : मागील वर्षी दुष्काळाची होरपळ, तर या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सुरू असताना शेतकऱ्यांना पीक विम्याची भरघोस मदत मिळाली आहे. तालुक्यातील ७७ हजार शेतकऱ्यांना तब्बल १३९ कोटी रुपये आतापर्यंत वितरित झाल्याने यातून शेतकऱ्यांची दिवाळी नक्कीच गोड होणार आहे. मागील वर्षी उत्पादनात ७५ ते ९० टक्के घट होऊन अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. (77 thousand farmers in God Yeola got crop insurance 139 crore in district)