Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

Nashik News : जानेवारीपासून एप्रिलपर्यंत जिल्ह्यात डेंगीसदृश ५७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७९ रुग्णांना डेंगीची लागण झाली.
Health department staff while searching for mosquito breeding places in Zilla Parishad premises
Health department staff while searching for mosquito breeding places in Zilla Parishad premisesesakal
Updated on

Nashik News : शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही डेंगीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत जिल्ह्यात डेंगीसदृश ५७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७९ रुग्णांना डेंगीची लागण झाली; तर जूनमध्ये तब्बल २८ रुग्ण सापडले आहेत. यंदा अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. (79 patients infected with dengue in district)

दरम्यान, वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने विविध उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिली. शहरात डेंगी रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. गत वर्षभरात एक हजार १९१ डेंगीबाधीत रुग्ण आढळले होते.

यंदाच्या मेपासून शहरात डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. या महिन्यापासून डेंगी रुग्ण बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. जूनमध्ये शहरात तब्बल १६१ डेंगीबाधीत रुग्ण सापडले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या तीनसदस्यीय पथकाने शहरात सर्वेक्षण केले. शहरात डेंगीबाधित रुग्ण वाढत असताना ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मेपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

जिल्ह्याचे तापमान थेट ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. यातच उष्णतेची लाट होती. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी साचवून ठेवले जात आहे. उष्णता वाढल्याने घराघरांत कूलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढल्याने डेंगींच्या रुग्णांची वाढ झाली. आरोग्य विभागाच्या झालेल्या सर्वेक्षणात अनेक घरांतील कूलरमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या होत्या. (latest marathi news)

Health department staff while searching for mosquito breeding places in Zilla Parishad premises
Nashik Monsoon Dealey : बेपत्ता पावसाने 75 टक्के पेरण्या धोक्यात? शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

तर, साचविलेल्या पाण्यातही अळ्या सापडत आहेत. त्यामुळे मेमध्ये डेंगीचे आठ रुग्ण सापडले होते. जूनमध्ये ही संख्या २८ वर पोहोचली आहे. जानेवारी ते ५ जुलै या कालावधीत १५ तालुक्यांतून एकूण ५७७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी डेंगीचे ७९ रुग्ण सापडले आहेत. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.

मॉन्सूनचे जिल्ह्यात आगमन झाले. मात्र, काही भागांत जोरदार पाऊस आहे; तर काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी आहे. त्यामुळे डेंगीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत डेंगीसदृश रुग्णांची तपासणी करण्याबाबत सूचना केल्याची माहिती डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिली.

तालुकानिहाय डेंगीचे रुग्ण

तालुका घेण्यात आलेले नमुने बाधीत रुग्ण

इगतपुरी २७ ६

त्र्यंबकेश्वर ४५ १

नाशिक १०९ २०

पेठ ४७ ५

दिंडोरी १०७ १३

सुरगाणा १० १

कळवण २१ ५

देवळा ४ १

बागलाण १५ १

मालेगाव ९ २

नांदगाव १३ २

येवला ११ ३

सिन्नर ३९ ५

निफाड १०६ १२

चांदवड १४ २

एकूण ५७७ ७९

Health department staff while searching for mosquito breeding places in Zilla Parishad premises
Nashik Code Of Conduct : आचारसहिंता उठल्याने शासकीय कामांना वेग!

डेंगी/ चिकनगुण्यासदृश आजाराचे रुग्ण वाढत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात, प्रशासकीय इमारत व परिसरात, नाशिक पंचायत समिती व परिसर, जिल्हा प्रशिक्षण पथक येथे डास उत्पत्ती स्थाने शोधून त्यावर एबीटिंग करून नष्ट करण्यात आले.

या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन महापालिका हिवताप कर्मचारी यांच्याकडून संपूर्ण इमारतीची व परिसराची तपासणी, स्वच्छता व धूर फवारणी करून घेण्यात आली. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण होणार नाही, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात तसेच घरी काय काळजी घ्यावी, याबाबत आरोग्य विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

Health department staff while searching for mosquito breeding places in Zilla Parishad premises
Nashik News : उमेदवारी अर्ज विक्री, स्‍वीकृती आजपासून; नाईक शिक्षण संस्‍था निवडणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.