नाशिक : एका नाट्यलेखकाने लिहिलेली आणि एकाच नाट्य दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेली वेगवेगळ्या विषयाला अनुसरून समान सूत्र असणारी नाटके एकाच दिवशी रंगमंचावर सलग पाहण्याचा नाट्यानुभव ‘नाट्यचौफुला’ देतो. ही संकल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांची असून यात चार नाटकांचा आठ तासांचा प्रयोग मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम ठरत आहे. नाशिकचे प्रसिद्ध नाट्यलेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे या जोडीची हंडाभर चांदण्या, तो एक राजहंस, कलगीतुरा, दगड माती या चारही नाटकांचे विषय १९९० नंतर ग्रामीण भागात बदलत गेलेल्या परिस्थितीशी निगडित आहेत. ( 8 hours of theatrical experience from drama successful initiative in history of Marathi theatre)